अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत लोडर भरती वरून गदारोळ होण्याची शक्यता…

0
381

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत लोडर भरती वरून गदारोळ होण्याची शक्यता…

भरती प्रक्रिया संशयाचा भोवऱ्यात…

नांदा :- कोरपना तालुक्यातील सिमेंट उद्योगा पैकी नामांकित कंपनी म्हणून ओळख असलेली अल्ट्राटेक सिमेंट कंपनी लोडर भरती प्रक्रिय सदर्भात झालेल्या घोळामुळे कंपनीचा लोडर कमागरा मध्ये असंतोष पसरला असून गदारोळ होण्याची शक्यता कामगारा कडून वर्तविली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, अल्ट्राटेक सिमेंट कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या लोडर यांचा मुलांना लोडर मध्ये सामावून घेण्याचे आदेश कंपनीच्या वरिष्ठ अधिकारी अधिकारी यांनी दिले होते. जुलै महिन्यात एकूण ६७ लोडर हे कामावरून निवृत्त झाले. लोडर भरती होवून आपला मुलगा ही लोडर कामावर जाणार या आशेवर निवृत्त लोडर कर्मचारी होते. परंतू कंपनीने पुन्हा वेगळा आदेश काढला की आता फक्त कामावर असलेल्या कामगाराचे मुले घेण्यात येईल. मात्र कामगाराचा कानालाही खबर न होवू देता अधिकारी यांनी ठेकेदारी पद्धतीने काम करीत असलेल्या व लोडर मध्ये काम करीत असलेल्या 30 मुलांची मेडिकल करून सरळ भरती करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा परिसातील युवकांना माहीत न होता पुन्हा 30 मुलांची भरती घेतल्याने कामगार व युवकांमध्ये असंतोष पसरल्याचे दिसून येत आहे.

अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा वरीष्ठ अधिकारी यांनी लोडर चा मुलांना कामावर घ्यायचे असे आदेश काढले होते. परंतू एक, दोन, नाही तर तब्बल तीन वेळ आदेश वेगवेगळे काढल्याने आणि कोणाचाही कानाला खबर न होता भरती प्रक्रिया राबवून सावरा सावर केल्याने कुठे तरी पाणी मुरतंय असा संशय कामगार मध्ये होता पुन्हा परत 30 मुलांना थांगपत्ता न लागत लोडर मध्ये घेतल्याने कुठे तरी पाणी मुरतंय असा संक्षय होवू लागला आहे.

लोडर कामा करिता जवळ पास अंदाजे 2500 हजार युवकांनी कागदो पत्राची जुळवा जुळव करून फॉर्म भरले. या पैकी ज्यांचे वडील लोडर मध्ये कार्यरत आहे तसेच निवृत्त व मयत झालेल्या मुलांची टेस्ट घेण्यात आली. परंतू काही मोजक्याच लोकांना मेडिकल टेस्ट ला बोलावून त्याची भरती करण्यात आली. लोडर कामा करिता मनुष्य शारीरिक दृष्ट्या सक्षम व धष्टपुष्ट असणे आवश्यक असले तरी भरती करतांना हे देखील बघितले नसून काही लोकांची अशीच भरती करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

लोडर भरती प्रक्रियेत 30 युवकांना सामावून घेतल्याने लोडर कामगारा अमशे कल्लोळ माजला आहे. कोणत्या अटी व शर्तीवर भरती प्रक्रिया राबविण्यात आली याची कुणालाही कुणकुण नाही. तसेच वर्षानुवर्षे काम करणारे अनुभवी लोकांना सुध्दा डावलन्यात आल्याने कामगरा मध्ये असंतोष माजला असून भरती प्रक्रिया संशयाचा भोवऱ्यात असल्याची दिसून येत आहे.

आवाळपूर येथील काही कामावर असलेल्या परंतू त्यांचा अपघाती मृत्यु झालेल्या अशा कामगारांचा काही मुलांना अल्ट्राटेक कंपनी अधिकारी व पदाधिकारी यांचा समक्ष आश्वासन दिल्याचे कळते परंतू आता झालेल्या भरतीत देखील त्यांचा तोंडाला पाणी पुसले असल्याने त्या युवकामध्ये नाराजी सुरु उमटू लागला आहे. आश्वासन दिलेल्या मुलांना लोडर मध्ये न घेतल्यास आवाळपूर येथील युवक व रिपब्लिक पार्टी चा वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कंपनी चा एका वरिष्ठ अधिकारी व काही युनियन पदाधिकारी यांनी काही युवकांना हाताशी धरून सेटिंग करून त्यांचा कडून पैसे घेऊन भरती केल्याची खमंग चर्चा पंचक्रोशीत व कामगारा मध्ये सुरू आहे. यामुळे लोडर भरती प्रक्रिया ही संशयाचा भोवऱ्यात सापडली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

“भरतीच्या निकषांविषयी युवकांमध्ये संभ्रम आहे. एका युनियन पदाधिकाऱ्याच्या व कंपनी अधिकाऱ्याच्या आर्थिक व्यवहार व वशिलेबाजीतून भरती करण्यात आली असून यासंदर्भात युवकांमध्ये प्रचंड रोष आहे. दहा वर्षापासून ठेकेदारीत काम करणाऱ्या कामगारांना डावलून दोन-तीन वर्षे काम करणाऱ्या ठेकेदारीतील आर्थिकदृष्ट्या सक्षम कामगारांची निवड करण्यात आली आहे. जे नियमाविरुद्ध आहे. भरती प्रक्रिया रद्द करुन नव्याने पारदर्शकपणे भरती करावी.”-  आशिष देरकर, पसरपंच ग्राम पंचायत बिबी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here