राजुऱ्यात सुगंधित तंबाखू व्यावसायिकावर कार्यवाही

0
395

राजुऱ्यात सुगंधित तंबाखू व्यावसायिकावर कार्यवाही

एक विक्रेता अटकेत, अन्य एक विक्रेता फरार

राजुरा : राज्य शासनाने घातक सुगंधित तंबाखू व गुटखा विक्री वर बंदी घातली आहे. पण या बंदी आदेशाला ठेंगा दाखवून शहरात खुलेआम तंबाखू विक्री केली जात आहे. या विक्रेत्यांचा हा गोरखधंदा मागील काही वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू आहे पण कारवाई व्यवसायिकांना खुली सूट मिळत आहे. दरम्यान माता मंदिर वार्डात बंदी तंबाखू ची साठवणूक व विक्री करणाऱ्या मनीष पंजवानी या विक्रेत्यांला अटक करण्यात आली आहे. या व्यवसायिकांकडून दोन लाखापेक्षा जास्त तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्य एक विक्रेता फरार झाला आहे. शहरात तंबाखू व गुटखा विक्रेत्यांनी चांगलाच जम बसविला आहे. शासनाच्या बंदी आदेशाला केराची टोपली दाखवून व्यवसाय केला जात आहे. सध्या डॉ आंबेडकर, नेहरू, गांधी चौकासह नाका नंबर ३, पंचायत समिती व आसिफाबादकडे जाणाऱ्या मार्गावरच्या काही दुकानात खुलेआम तंबाखू ची साठवणूक व विक्री केली जात आहे. या व्यवसायिकांचा गोरखधंदा मागील काही वर्षांपासून बेधडकपणे सुरू आहे.

पण आजतागत नाममात्र कारवाई वगळता कठोर कारवाई करण्यात आली नसल्याने व्यवसायिकांचे चांगलेच फावत आहे. विशेष म्हणजे, कोरोना काळात या व्यवसायिकांनी वाढीव दरात तंबाखूची विक्री करून चांगलीच तिजोरी भरली. या दोन वर्षात काही विक्रेते लखपतीच्या पंगतीत बसल्याचे समोर आले आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात तंबाखूचा व्यवसाय सुरू असतांना सुध्दा अन्न व औषध प्रशासन विभाग मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याने अधिकाऱ्यांची कार्यप्रणाली संशय निर्माण करणारी ठरत आहे. दरम्यान माता मंदिर वार्डात तंबाखूची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून दोन लाखापेक्षा जास्त तंबाखू जप्त केला आहे. यात मनीष पंजवानी या विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. अन्य एक विक्रेता फरार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here