ओबीसी बांधवांनी जागृत होऊन एकजुटीने लढणे गरजेचे – प्रा. नितेश कराळे

0
408

ओबीसी बांधवांनी जागृत होऊन एकजुटीने लढणे गरजेचे – प्रा. नितेश कराळे

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
ओबीसी समाजाची जनगणना आजपर्यंत न झाल्यामुळे ओबीसी समाजातील नागरिकांना त्याप्रमाणात आरक्षण देण्यात येत नाही.52 टक्के ओबीसी समाजाची संख्या दाखविण्यात आली होती.आता ती कुठल्या संख्येत असेल जनगणना झाल्यावरच कळेल. ओबीसी समाजाची संख्या देशात सर्वात जास्त असूनही स्वातंत्र्यानंतरही या समाजाला डावलण्यात आले.यामुळे ओबीसी समाजात मोठा असंतोष असून शासनकर्ते मात्र ओबीसींची जनगणना व्हावी अशा मानसिकतेत दिसत नाही. आता ओबीसींनी जागृत होऊन शासनकर्त्यांच्या विरोधात एकजुटीने लढण्याची गरज निर्माण झाल्याचे मत फिनिक्स अकॅडमीचे प्रा.नितेश कराळे यांनी व्यक्त केले.

ते गडचांदूर येथे ओबीसी युवा मंचातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ओबीसी परिषद कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर अडबाले होते तर स्टुडंट राईट असोसिएशन अध्यक्ष उमेश केराम हे प्रमुख मार्गदर्शक, स्वागताध्यक्ष गडचांदूर न.प. उपाध्यक्ष शरद जोगी यांची उपस्थिती होती.प्रा.कराळे यांनी मार्गदर्शन करताना आपल्या वऱ्हाडी बोलीच्या शैलीतून उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.सध्या वर्तमान काळात शैक्षणिक क्षेत्रात पदवीधर होऊन सुद्धा नोकरी करीता भटकंती करावी लागते.यामागचे कारण समजून घेण्याचे आवाहन जेएनयू राईट्स असो.अध्यक्ष उमेश कोराम यांनी स्पर्धा परीक्षेबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमात सुनील बिडवाईक, राकाँ राजूरा विधान सभाध्यक्ष तथा माजी जि.प.सभापती अरूण निमजे, पांडुरंग जाधव, हरिदास गौरकर,अशोक घुंगरूड, बंडू डाखरे,वामन भिवापूरे, नामदेव ठेंगणे,मनोज भोजेकर,सतीश बेतावर,बंडू वैरागडे, रवी शेंडे,उमेश आंबेकर,अरूण डोर्लीकर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण काकडे, सुनील आर्किरवार, मयुर एकरे, अतूल गोरे, करणसिंग भुराणी, प्रवीण मेश्राम, गणेश तुरणकर, योगेश्वर गोखरे, देवराव ठावरी, विलास कोंगरे, प्रकाश टेंभुर्डे, सुधाकर तुरणकर, गोविंदा लोहे, संदीप काळे, रमेश परसुटकर, संदीप गिरटकर, सतीश बिटकर यांच्यासह ओबीसी युवा मंचाच्या समस्त सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. संचालन प्रवीण काकडे, प्रास्ताविक गणेश लोंढे तर आभार सुनील अरकीलवार यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here