रेतीघाटाचे अधिकार महिला बचत गटांना देवून शासनाने खरे महिला सक्षमीकरण करावे- आम आदमी पार्टी ची मागणी

0
379

रेतीघाटाचे अधिकार महिला बचत गटांना देवून शासनाने खरे महिला सक्षमीकरण करावे- आम आदमी पार्टी ची मागणी

– प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारयांशी चर्चा.

चिमूर विधानसभेतील वाढत्या रेती तस्करीला आढा घालण्यासाठी शासनाने त्वरित रेतीघाटाचे लिलाव करावे तसेच लिलाव पद्धतीमध्ये ग्रामीण महिला बचत गटांना प्राधान्य देवून महिलांचे खरे सक्षमीकरण करावे या मागणीसाठी आम आदमी पार्टी चे जिल्हाअध्यक्ष श्री सुनीलजी मुसळे, भोजराज सोनी यांच्या उपस्थितीत चिमूर विधानसभा प्रमुख प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

चिमूर विधानसभेत सध्या भ्रष्टाचाराचे अधिराज्य असून रेती व दारू तस्करी ला उधान आलेले आहे. संपूर्ण विदर्भात चिमूर विधानसभेची ओळख ‘भ्रष्टाचाराची राजधानी’ अशी होत असून भ्रष्टाचारासाठी राजकीय ‘आशीर्वाद’ हा आता सगळीकडे चर्चेचा विषय होत आहे. या सर्व प्रकरणात गुप्तपणे सी.आय.डी. चौकशी होऊन खरे चेहरे समोर आणावे यासाठी आम आदमी पार्टी तर्फे गांधी जयंतीनिमित्त लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते, याची दखलही शासनाने घेतली आहे.

महिलांचे खरे सक्षमीकरण करायचे असल्यास शासनाने रेतीघाटाचे अधिकार सबंधित गावातील महिला बचत गटांना द्यावे तसेच लिलाव पद्धतीमध्ये ग्रामीण महिला बचत गटांना प्राधान्य द्यावे यासबंधी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. या प्रक्रियेत ग्रामीण महिला बचत गटांना आम्ही सामावून घेवू असे आश्वासन भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी दिले.

याप्रसंगी आम आदमी पार्टी चे सुनीलजी मुसळे, भोजराज सोनी, प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे, कैलास भोयर, अशोक मेश्राम, विनोद सातपुते, विशाल इंदोरकर, आदित्य पिसे, मंगेश शेंडे, रंजना मेश्राम, नीता धोंगडे,कल्पना मेश्राम, पार्वती रामटेके व अनेक पदाधिकारी आणी स्वयंसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here