राजुरा उड्डाणपुलानजीक युवकाचा अपघाती मृत्यू

0
661

राजुरा उड्डाणपुलानजीक युवकाचा अपघाती मृत्यू

राजुरा, वा. 14 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता राजुरा रेल्वे उड्डाण पुलाजवळ परस्परविरोधी रस्त्याने येणाऱ्या दोन मोटर सायकलमध्ये जोरदार धडक होऊन त्यात राजुरा येथील एक युवक ठार झाल्याची घटना घडली. दुसरा दुचाकी स्वार गंभीर जखमी असून त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

राजुरा येथील सुरज मदन सूर्यवंशी हा जवाहरनगर वॉर्डातील रहिवाशी एमबीएचा पेपर देऊन राजुराकडे येत असताना साई मंदिरजवळ त्याच्या गाडीला अविनाश शेडे या राजुराकडून बल्लारपूरकडे जाणाऱ्या युवकाने जोरदार धडक दिली. दोन्ही मोटर सायकलच्या टक्करमध्ये दोन्ही मोटर सायकल स्वार खाली पडले. दोघांनाही त्वरित नागरिकांनी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. मात्र येथे सुरज सूर्यवंशी, (30) याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

सुरज सूर्यवंशी यांचे मागील वर्षी लग्न झाले होते. नुकतेच त्यांनी स्टेशनरी व जनरल साहित्याचे दुकान लावले होते. तरुण आणि सुस्वभावी युवकाचा मृत्यू झाल्याने राजुरा येथे शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here