मॅजिक बस इंडिया फाउंडेशन तथा शिवराया क्रीडा मंडळ गडीसूर्ला द्वारा महिलांचे कब्बडी टुर्नामेंट आयोजित

0
377

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन तथा शिवराया क्रीडा मंडळ गडीसूर्ला द्वारा महिलांचे कब्बडी टुर्नामेंट आयोजित

मुल तालुका प्रतिनिधी

मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाउंडेशन मुल येथील शाळा मधील मुल तालुक्यात SCALE कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळा द्वारे जीवन कौशल्य विकास हा उपक्रम अविरतपणे राबविल्या जात आहे. आज दिनांक 14 जानेवारी 2023 रोजी गडीसुर्ला येथे मॅजिक बस तथा शिवराया क्रीडा मंडळ गडीसूर्ला द्वारा महिलांचे एक दिवसीय कबड्डी सामने आयोजीत केले होते या टुर्नामेंट चा उद्देश महिलांनी चूल आणि मुल एवढच मर्यादित न राहता सगळ्या क्षेत्रात प्रगती करावी व खेळांमधे आपल्या कौशल्याचा वापर करावा आणि आपल्या मुलांना शिकविले जाणारे कौशल्य यामधे त्यांना जीवनात कामी येण्यास मदत करावी अश्या विविध उद्देशाने हे टुर्नामेंट चे आयोजन केले होते.

या टुर्नामेंट ला मुल तालुक्यातील चिमढा, भवराळा, फिस्कुटी,बाबराळा,नांदगाव, गडीसूर्ला गावांच्या संघांनी आपली उपस्थिती दाखविली.या संघांपैकी फिस्कुटी संघांनी पहिला तर गडीसूर्ला संघांनी दुसरा क्रमांक पटकाविला.सर्व महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षा ताई मोहूर्ले यांनी केले प्रास्ताविक दिनेश कामतवार शाळा सहाय्यक अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन शुभांगी रामगोनवार यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित केंद्र प्रमुख कोपुलवार सर,गावचे सरपंच सौ. शारदा ताई येनूरकर,सदस्य गावातील पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भाऊ कावळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, आंबेडकर विद्यालयाचे संपूर्ण शिक्षक एच. एम,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक,राजश्री शाहू महाराज कॉलेज चे शिक्षक युवा वर्ग तथा गावातील संपूर्ण महिला उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकर शाळा गडीसूर्ला येथील बालपंचायत आणि शिवराया क्रीडा मंडळ गडीसुर्ला मोलाची कामगिरी केली.शाळा सहाय्यक अधिकारी शुभांगी रामगोनवार, दिनेश कामतवार,मंजुषा कुरेकार,सोनम लाडे समुदाय समनव्यक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here