कुकुडसात ग्राम पंचायत चे नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा ना. सुधीर भाऊंच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश

194

कुकुडसात ग्राम पंचायत चे नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा ना. सुधीर भाऊंच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश


नुकत्याच झालेल्या ग्रा. प. कुकुडसात च्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचत सरपंच शंकर आत्राम व उपसरपंच गजानन आस्वले यांनी राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते मा.ना.श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शुक्रवार दि. १४.०१.२०२३ रोजी राजुरा येथे दौऱ्यादरम्यान माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. ना. मुनगंटीवार यांनी पक्षाचे दुपट्टे घालून अभिनंदन केले.

यावेळी बोलतांना ना. सुधिरभाऊंनी कुकुडसात गावाचा सर्वांगिन विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्वस्त केले व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या व्यक्ती पर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भाजप चे ज्येष्ठ नेते विलासराव बोनागिरवार, ज्येष्ठ पदाधिकारी अरुण मस्की, भाजप तालुका अध्यक्ष, माजी सभापती सुनील उरकुडे, जिल्हा सचिव, माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, जिल्हा सचिव विनायक देशमुख, खामोना ग्रा.प.सरपंच तथा जिल्हा सचिव हरिदास झाडे, ग्राम विकास व पंचायतराज आघाडीचे सहसंयोजक प्रदीप बोबडे, भाजयुमो चे सचिन डोहे, सचिन शेंडे, चुनाळा ग्रा. प. चे सरपंच बाळू वडस्कर, जनार्धन नीकोडे सह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच व उपसपंचांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याबद्दल बद्धल भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजयभाऊ धोटे, कोरपना भाजप तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, राजुरा विधानसभा विस्तारक सतिश उपलेंचवार, कोरपना न.प.चे नगरसेवक किशोर बावणे, प. स. कोरपना माजी सभापती ज्येष्ठ नेते संजय मुसळे, गडचांदुर न. प. चे माजी नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते नीलेश ताजने, भाजप ज्येष्ठ नेते रमेश पाटील मालेकर, कोरपना भाजप शहर अध्यक्ष अमोल आसेकर, भाजप जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी अरविंद डोहे, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप पिंपळ शेंडे, भाजयुमो उपाध्यक्ष आशिष ताजने, भाजपा आदिवासी आघाडी चे नेते अरुण मडावी, भाजपा पदाधिकारी पुरुषोत्तम भोंगळे सह भाजप कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

advt