धाबा येथे वीज बिलाची होळी

0
379

विदर्भराज्य आंदोलन समितीचा पुढाकार

चेतन मांदाडे /प्रतिनिधी

गोंडपिपरी : लाकडावूनच्या काळातील सर्व तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे,आणि पुढे दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी यासह अन्य मागण्यांना घेऊन गोंडपीपरी येथील विदर्भवादी आक्रमक झाले असून,गोंडपीपरी तालुक्यातील धाबा येथे विदर्भराज्य आंदोलन समिती च्या वतीने वीजबिलची होळी करण्यात आली. व तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे, अशा मागणीचे निवेदन विद्युत वितरण कंपनी कार्यालय धाबा येथील कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आले.
या आंदोलनात वीज बिल माफीसह यापुढे 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी, विजेचा उत्पादन खर्च केवळ 2.50 रु. असताना घरगुती ग्राहकांना सरासरी 7.50 रु. प्रती युनिट व व्यावसायिक, औद्योगिक वापराला आकारले जाणारे 11.50 रु. प्रती युनिट हे दर तातडीने निम्मे करण्यात यावे, विदर्भात गेल्या तीन वर्षात सततची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेती पंपाचे थकीत वीज बिल कायमचे संपवण्यात यावे,विदर्भात शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी व मागेल त्याला वीज कनेक्शन देण्यात यावे व लोडशेडिंग कायमची संपवण्यात यावी.आदी मागण्यांना घेऊन विदर्भवादी आक्रमक झाले होते.याप्रसंगी तालुक्यातील शेकडो शेतकरी यांनी या आंदोलनाला प्रतिसाद देत वाढीव आलेले वीजबिल वीज वितरण कार्यालयासमोर जाळून, नारेबाजी करून निषेध करण्यात आला. व तीन महिन्याचे वीज बिल पूर्ण माफ करण्याची एकमुखी मागणी केली, याप्रसंगी आंदोलनाचे नैतृत्वऊ माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भराज्य आंदोलन समितीचे तालुका अध्यक्ष अरुण वासलवार यांनी केले,तर याप्रसंगी ,तुकेश वानोडे,डाँ. संजय लोहे, आनंद खर्डीकर, सूर्यकांत मुंजेकर, श्रीराम काळे, मधुकर चिंचोलकर, शाम रामगिरकर, गुणवंत वाढई, पांडुरंग भोयर, ॲड. प्रफुल आस्वले, राजकुमार पिंपळशेंडे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here