गडचिरोली जिल्ह्यात लवकरच सुरू होणार मका खरेदी, शेतकरी आंदोलनाला यश

0
415

गडचिरोली जिल्ह्यात लवकरच सुरू होणार मका खरेदी, शेतकरी आंदोलनाला यश

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव मा. विलासजी पाटील यांची भेट घेवून २५ मे पासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांचे दिले निवेदन

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या भेटीनंतर गडचिरोली जिल्ह्यात मका खरेदीबाबत घेतला निर्णय

गडचिरोली, सुखसागर झाडे :- गडचिरोली विधानसभा क्षेत्रात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या धान व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, शेतकऱ्यांना धानाची रक्कम व बोनस मिळावे यासह विविध प्रश्नांसाठी आंदोलन सुरु असून याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव मा. विलासजी पाटील यांची गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली . यादरम्यान त्यांनी प्रधान सचिव यांना आंदोलनाबाबत माहिती अवगत करून दिली असता माननीय प्रधान सचिव यांनी तातडीने मका खरेदी करण्याचे लवकरच निर्देश दिले जातील याबाबत आश्र्वासित केले . यावेळी गडचिरोली जिल्हाधिकारी दिपकजी सिंगला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या शेतकरी आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून या आंदोलना दरम्यान त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेतली. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी आंदोलना बाबत प्रधान सचिवांना कल्पना होतीच भेटी दरम्यान आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले व सदर मागण्या तातडीने मंजूर करण्याची विनंती केली. त्यांच्या निवेदनाला मान देत लवकरच मका खरेदी करण्याचे निर्देश देण्यात येतील असे प्रधान सचिव यांनी आमदार महोदयांना आश्वासित केले. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकरी बांधवांचा मका खरेदी केंद्रावर घेतला जाणार आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या आंदोलनाला मिळालेले हे एक मोठे यश असून मका उत्पादक शेतकर्‍यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here