बाल लैगिंक अत्याचार कायद्याने गुन्हेगारास सात वर्षानंतर न्यायालयाने आरोपीस ठोठावली 3 वर्षाची शिक्षा.

0
522

 

अरुण रामुजी भोले

नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड —-नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुलेझरी येथील तक्रार कर्त्याने 12 नोव्हेंबर 2015 रोजी नागभिड पोलीस स्टेशन येथे तोंडी तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुलेझरी येथील अल्पवयीन मुलीचे मोबाईलवर अशिल्ल फोटो प्रदर्शित करून आय लव यू , यू सो, माय लव्हली असे लैगिंकता पूर्वक शेरेबाजी करण्यात आली असल्याची तक्रार केली होती.

तत्कालीन पोलीस निरीक्षक बारीकराव मडावी यांनी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. मा अति सत्र न्यायाधीश दीक्षित ,न्यायालय चंद्रपूर यांचे न्यायालयात सुनावणी होऊन 8 साक्षीदार तपासून आरोपीस सात वर्षानंतर न्यायालयाने दिनांक 10जानेवारी 2023रोज मंगळवारी शिक्षा सुनावली.कलम,354 अ 1,4 भा द वी सह कलम 12 बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये 3 वर्षाची सजा व दंड न भरल्यास 3महिने सजा व कलम 67 ब माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये 1 वर्षाची शिक्षा व 1000 रुपये दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा आरोपी नामे श्रीकृष्ण नामदेव तडस रा,मुरपार तालुका हिंगणघाट यास शिक्षा सुनावली आहे.

सरकारी पक्षातफैॅ वकील संदिप नागपुरे स्वाती देशपांडे यांनी काम पाहिले,अशी माहिती पोलीस निरिक्षक राजू मेंढे नागभीड यांनी दिली,त्यामुळे मोबाइल वर अश्लील फोटो टाकणाऱ्यावर मोठी चपराक बसली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here