विरुर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. प्रीती पवार यांची बिनविरोध निवड

0
647

विरुर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ. प्रीती पवार यांची बिनविरोध निवड


विरुर स्टेशन/अविनाश रामटेके

राजुरा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या विरूर ग्रामपंचायत च्या आज उपसरपंच पदाकरिता घेतल्या गेलेल्या विशेष सभेत खुल्या प्रवर्गातून राष्ट्रीय कांग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या सौ प्रीती पवार यांची उपसरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित सरपंच अनिल बंडू आलाम यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विशेष सभेत नवनिर्वाचित सदस्या प्रीती पवार यांचा निर्धारीत वेळेत एकच अर्ज आला. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थित कांग्रेस च्या सौ प्रीती पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्वानी त्यांचे अभिनंदन केले.

विशेष म्हणजे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सौ प्रीती पवार यांचा ईश्वर चिट्टी ने विजय झाल्यामुळे त्यांनी यावेळी परमेश्वराची आठवण करीत मतदारांचे आभार मानले तर
माझ्या विजयात तालुका वरिष्ठ पक्षश्रेष्ठींचा व विरुर येथील स्थानिक कांग्रेस कार्यकर्ते यांचा मोठा वाटा असून गावातील जनतेचे प्रेम पाहता येत्या काळात सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणारी विकास कामे दलित व आदिवासी वस्तीतील प्रलंबित कामे, गावातील रस्ते ,पाणी योजना, स्वछता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ विरुर व सुंदर विरुर करणार असल्याचा मानस सौ प्रीती पवार यांनी सदर प्रतिनिधी जवळ बोलून दाखविली आहे.

सदर निवडणूक प्रक्रिया निवडणूक निरीक्षक अधिकारी आर एस रत्नपारखी व ग्रामसेवक जी नैताम यांनी काम पाहिले व पुढील विकासकामकरिता नवनिर्वाचित सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here