गोंडपिपरी तालुक्यात सहा गावात शिवसेना शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या

0
673

 

गोंडपिपरी-प्रतिनीधी

सध्या स्थितीत राज्यात शिवसेना कुणाची यावरून वाद सुरू असताना शिवसेना नेमकी कुणाची हे कोर्टाच्या निर्णयानंतर लवकरच समजणार आहे.अशा वेळी गोंडपिपरी तालुक्यात मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात नवचैतन्य दिसून येत आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्शभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीने पक्षात जोश संचारला आहे.दि.(९) सोमवारी स्थानिक विश्राम गृहात शिवसेना पक्षाची बैठक पार पडली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत कदम,जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे,जिल्हा उपप्रमुख संदीप करपे यांच्या मार्गदर्शनात राहुल सुकरू मेकर्तीवार वढोली शाखा प्रमुख,हिम्मत वाघाडे शाखा प्रमुख पोडसा (नवीन),सिकंदर गिनघरे शाखा प्रमुख सकमुर,शुभम ढपकस शाखा प्रमुख वेडगाव,मनोज येलमुले शाखा प्रमुख भणारहेटी,अमृत पचारे करंजी शाखा प्रमुख अशा सहा गावात शाखा प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या निवडीचे नियुक्त पत्र देण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,नगरसेवक यादव बांबोडे, युवासेना तालुका प्रमुख तुकाराम सातपुते,युवासेना शहर प्रमुख विवेक राणा ,युवासेना तालुका उपप्रमुख गौरव घुबडे,गणेश रामगिरकर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here