नववर्षाचे असेही स्वागत… छावा फाउंडेशन राजुरा तर्फे गरजूना अन्नदान व केक कापून केले नव वर्षाचे जल्लोषात स्वागत

0
566

नववर्षाचे असेही स्वागत…
छावा फाउंडेशन राजुरा तर्फे गरजूना अन्नदान व केक कापून केले नव वर्षाचे जल्लोषात स्वागत

राजुरा : राजुरा येथे अल्पावधीतच नावारूपास आलेली छावा फाउंडेशन राजुरा या सामाजिक संस्थेद्वारे नववर्षाचे स्वागत गरजूना अन्नदान व त्यांच्या सोबतच केक कापून जल्लोषात साजरे करण्यात आले.
छावा फाउंडेशन ही संस्था विविध प्रकारे सामाजिक उपक्रम घेत असतें. पुस्तकं वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम, विविध धार्मिक, सामाजिक रॅलीमधे शरबत, बिस्कीट, फळ, मसाले भात वाटप करणे, शैक्षणिक साहित्य वितरण, अंत्यविधी करिता सुद्धा मदत करण्यासाठी या संस्थेच्या पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन आपली सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. ऐरवी फटाके फोडून, पार्टी करून, मोठया कर्कश आवाजात डी. जे. वाजवून नववर्षाचे स्वागत केल्या जात असल्याचे चित्र दिसते. परंतु अश्या प्रकाराला बगल देत छावा फाउंडेशन ने मात्र गरजूना अन्नदान करून नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. यावेळी छावा फाउंडेशन चे अध्यक्ष आशिष करमरकर, उपाध्यक्ष बबलू चव्हाण सचिव आकाश वाटेकर कोषाध्यक्ष संदीप पोगला , भूषण रागीट, प्रज्वल कुईटे,स्वप्नील मायकलवार ,चेतन कोठे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here