विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

0
1002

विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

 

विरुर स्टे./राजुरा, 19 फेब्रु. : विरुर स्टे. येथून जवळच असलेल्या कविटपेठ येथील तरुणाने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा सापविल्याची घटना घडली आहे. मृतक तरुणाचे नाव अजय इंद्रप्रकाश बक्षे (26) आहे.

आज सकाळी 11 वाजेच्या आसपास राहत्या घरी सदर तरुणाने रासायनिक औषधी प्राशन केली. उपचारार्थ राजुरा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. येथून चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारास प्रतिसाद न दिल्याने श्वास सोडला. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, आई, आजी असा आप्त परिवार असून गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here