भद्रावती महिला बुरुड समाज संघटना व श्री संत केतेश्वर स्वामी महिला बुरुड समाज बचत गट तर्फे स्नेह मिलन सोहळा संपन्न

0
549

भद्रावती महिला बुरुड समाज संघटना व श्री संत केतेश्वर स्वामी महिला बुरुड समाज बचत गट तर्फे स्नेह मिलन सोहळा संपन्न

 

भद्रावती येथे नुकताच दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मकर संक्रांती निमित्य भद्रावती महिला बुरुड समाज संघटना व श्री संत केतेश्वर स्वामी महिला बुरुड समाज बचत गट तालुका भद्रावती तर्फे स्नेह मिलन सोहळा कार्यक्रम माजी नगर सेवक राजू गैनवार यांच्या निवास स्थान परिसरामध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभना केशव गैनवार श्री संत केतेश्वर स्वामी महिला बुरुड समाज बचत गट सचिव ह्या होत्या. सर्व प्रथम श्री संत केतेश्वर स्वामी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. व मंचावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून वंदना राजू गैनवार भद्रावती महिला बुरुड समाज संघटना अध्यक्षा, शोभना केशव गैनवार, ज्योती संतोष बोमीडवार श्री संत केतेश्वर स्वामी महिला बचत गट अध्यक्षा, वनिता प्रदीप पदमगीरवार उपाध्यक्षा, सोनू संतोष पटकोटवार सहसचिव, मीना पांडुरंग वासमवार संघटक, कोमल रवींद्र गैनवार कार्याध्यक्ष इत्यादी मंचावर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात वाण (गिफ्ट) वाटप करण्यात येऊन या मध्ये उखाणे, मनोरंजन व कलात्मक असे विविध उपक्रम राबविण्यात आले. डेकोरेशन व रांगोळी सजावट सुशोभित करण्यात आले होते.

या मध्ये कोविडं चे सर्व नियम पालन करण्यात आले. मास्क व सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात शेकडो च्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर स्नेह भोजनाचा सर्वांनी लाभ घेतला.

हा कार्यक्रम यशस्वी करने करीता अश्विनी पदमगीरवार, रेखा सत्रमवार, कविता सुलभेवार, मेघा जवादे, चैताली कंदेकटेवार, नंदा सत्रमवार, शारदा वासमवार, लीना सुलभेवार, विमल वासमवार, शोभा बोमीडवार, जयश्री मंथनवार, सिंधू बोमीडवार, विशाखा मंचलवार, राजश्री उरेवार, ममता मंचलवार, लीना सुलभेवार, पूजा सत्रमवार, सोनू सुलभेवार, राणी वासमवार इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here