समाजाच्या आत्मोन्नतीसाठी अध्यात्म गरजेचे – आ. किशोर जोरगेवार

0
523

समाजाच्या आत्मोन्नतीसाठी अध्यात्म गरजेचे – आ. किशोर जोरगेवार

बंगाली कँम्प येथे श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञाचे आयोजन

 

बदलत्या काळातील व्यस्त युगात मानव अध्यात्मतेकडे दुरावले जात आहे. मात्र मानवी जिवनात अध्यात्म भागवत कथा याची अत्यंत गरज आहे. कारण मनाची शुद्धी भागवत कथेने होते. यामुळे शंका दूर होतात, मनशांती लाभून आत्मचिंतन करता येते. त्यामूळे समाजाच्या आत्मोन्नतीसाठी अध्यात्म गरजेचे आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

 

बंगाली कॅंम्प येथील काली माता मंदिर येथे देवी संगीता किशोरी यांच्या श्रीमद् भागवत सप्ताह ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगर सेवक दिपक जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शाहा, यंग चांदा ब्रिगेडच्या बंगाली महिला समाज शहर अध्यक्षा सविता दंडारे, निताई घोष, कृष्णा कुंडू, रमेश सरकार, अमोल हलदार, प्रदिप शाहा, कमलेश दास, जनविजय राजवंशी, ढलाई बिस्वास, तारक दत्ता, रमेश पाल, पोका अधिकारी आदिंची उपस्थिती होती.

 

यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, समाज प्रबोधन होणार नाही. तोवर सामाजिक क्षेत्राची चढवळ सक्षमरित्या पूढे जाऊ शकत नाही. त्यामूळे आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रासह अध्यात्मिक क्षेत्रातही काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याच उद्दिष्टातून महाशिवरात्रीच्या निमित्याने आम्ही 100 भजन मंडळांच्या भजन महोत्सवाचे आयोजन केले होते. असे आयोजन आम्हाला दरवर्षी घ्यायचे असून आता एक हजार भजन मंडळांचा भव्य भजन महोत्सव घेण्याचा निर्धार आम्ही घेतला आहे. हे भजन महोत्सव विविध भाषीय असणार आहे. त्यामूळे त्याचे महत्व अधिक आहे. बंगाली भाषिकांनीही आमच्या भजन महोत्सवात सहभाग घेत बंगाली भाषेत भजन गात भजन महोत्सवात रंगत भरली होती. या दरम्याण शहरात भक्तीमय वातारवण निर्मित झाले होते. यातून निरुत्साहाचे पतन झाले. असेही ते यावेळी म्हणाले.

 

सद्गुरूंना ओळखण्याची, त्यांचे अनुकरण भागवत कथा सतत ऐकण्याची गरज आहे. श्रीमद भागवत कथा श्रवण केल्याने जन्मजन्मातील सर्व दुर्गुण नष्ट होतात. जिवाचा वैश्विक व आध्यात्मिक विकास होतो. जेव्हा कथेचा अर्थ सिद्ध होतो, केवळ या कथा ऐकून चालणार नाही तर त्या आचरणातही ठेवाव्या लागतील तेव्हा आपले जिवन आनंदी राहिल अन्यथा ही कथा फक्त ‘मनोरंजन‘, कानाची चव यापुरतीच मर्यादित राहील. असेही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here