कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची “गाव तिथे राष्ट्रवादी” अभियान राबविण्याबाबत बैठक संपन्न

0
438

कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची “गाव तिथे राष्ट्रवादी” अभियान राबविण्याबाबत बैठक संपन्न

प्रतिनिधी .प्रवीण मेश्राम

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची “गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस” पक्षाची स्थापना अभियान राबविण्यात तालुक्यातील सर्व ६ पंचायात समिती क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कोरपना येथे रविवार दि.८ नोव्हे.ला संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके, विधानसभा अध्यक्ष श्री.अरुणभाऊ निमजे,ज्येष्ठ नेते श्री.आबिद अली, तालुक्याचे पक्ष निरीक्षक श्री.जयंत टेमुर्डे, अप्लसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री मेहमूद मुसा, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री शरद जोगी,तालुका महिला अध्यक्षा सौ.रितिका ढवस,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पहिल्या टप्प्यात येत्या १० दिवसात “गाव तिथं राष्ट्रवादी काँग्रेस” पक्ष बांधणीच्या बाबत सविस्तर नियोजन करण्यात आले,गावनिहाय जवाबदारी उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आली.या प्रसंगी श्री अरुण निमजे,श्री.आबिद अली,श्री.शरद जोगी,श्री मेहमूद मुसा,श्री.जयंत टेमुर्डे सौ.बेबीताई उईके व श्री राजेन्द्र वैद्य यांनी मार्गदर्शन केले.बैठकीला तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here