राजनगट्टा येथे पोलीस,आर्मी यासारख्या अन्य सैन्य भरती चे निशुल्क प्रात्यक्षिक प्रशिक्षण

0
385

राजनगट्टा येथे पोलीस,आर्मी यासारख्या अन्य सैन्य भरती चे निशुल्क प्रात्यक्षिक प्रशिक्षण

मायावृक्ष प्रतिष्ठान च्या सहकार्यातून व प्रतिष्ठान चे कार्यक्रम प्रमुख अनुप कोहळे यांच्या संकल्पनेतून राजनगट्टा या लहानश्या खेडे गावात उमेश भांडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सैन्य भरती ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज सकाळी गावा शेजारील जंगल परिसरात मोकळ्या जागेत सैन्य भरती प्रशिक्षण दिल्या जाते. उमेश भांडेकर हे नुकताच आर्मी मध्ये रुजू झाले असून सद्या ते रजेवर गावाकडे आले आहे, तेव्हा अनुप कोहळे यांनी उमेश यांच्याशी सम्पर्क करून गावातील व गावाशेजारील सैन्य भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची विनवणी केली असता उमेश भांडेकर यांनी या स्तुत्य उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दाखवत आपल्या परीने पूर्ण सहकार्य करण्याची हमी दिली. या उपक्रमाचा राजनगट्टा, कुंभारवाही, वालसरा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने लाभ घेत असून आणखी गरजू विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान मायावृक्ष प्रतिष्ठान च्या वतीने अनुप कोहळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here