शिराळा परिसरातील सोयाबिन पिक खोडकिडीमुळे उध्वस्त, नुकसान भरपाईची मागणी

0
301

शिराळा परिसरातील सोयाबिन पिक खोडकिडीमुळे उध्वस्त, नुकसान भरपाईची मागणी

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती (शिराळा ) :- चालू हंगामातील सोयाबीन पीक खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण नष्ट झाले आहे . सर्व्हे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई शासनाने द्यावी. अशी मागणी अनिल ऊर्फ राजू गंधे सचिव भा ज पा अमरावती जिल्हा ग्रामीण व खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली.
तसेच मा. तहसीलदार अमरावती तालुका यांना सुध्दा निवेदन दिले. त्यावेळी अनिल ऊर्फ राजू गंधे सचिव भा ज पा अमरावती जिल्हा ग्रामीण, भरत लव्हाळे, शरद पावडे, रोशन पांडे, अवधूत कोरडकर, दिलीप हुड, डॉ जिभकाटे, राजेश बांबल, निलेश तऱ्हेकर, सुरेश बोरकर, बाबुराव हटवार, ज्ञानेश्वर बांबल, सुरेश गंधे, मोहन वडे हे सर्व उपस्थित होते. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई शासनाने द्यावी अन्यथा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून रस्ता वर उतरु असे राजू गंधे म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here