क्षुल्लक वादावरून बामणवाडा येथे युवकाचा लोखंडी सुरी भोकसून खून…

0
2917

क्षुल्लक वादावरून बामणवाडा येथे युवकाचा लोखंडी सुरी भोकसून खून…

 

बामणवाडा (राजुरा), प्रतिनिधी : आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून स्थानिक रहिवासी युवकाचा लोखंडी सूरी भोकसून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृतक युवक हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर मोठे आभाळ कोसळले आहे.

सविस्तर वृत्त असे की, बामणवाडा येथे काही युवक खेळत असताना तेथे शक्ती सुरेश टेकाम (34) आला. त्याला खेळण्यास मृतक महादेव शंकर कोडापे (24) याने मनाई केली. यावेळी शक्तीने त्या जागेवर पाणी टाकले यामुळे खेळ बंद झाला. यावरून शक्ती आणि महादेव यांच्यात क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. मात्र याचा मनात राग ठेवून वचपा काढण्यासाठी शक्तीने घर गाठून कमरेत लोखंडी सूरी घेऊन परत आला. महादेव मोबाईलवर बोलत असताना ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर त्याच्या पोटात शक्तीने लोखंडी सूरी भोकसली. जवळ उपस्थित तरुणांनी महादेवला शासकीय रुग्णालय राजुरा येथे दाखल केले असता गंभीर असल्यामुळे चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. मात्र चंद्रपूर रुग्णालयातील डॉक्टरांनी महादेवला मृत घोषित केले. तर शक्ती हा राजुरा पोलीस ठाणे येथे स्वतः दाखल झाला. पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here