गोंडपिपरीत पोलीस वर्धापन सप्ताहनिमित्त क्रिकेट सामना रंगला

0
444

गोंडपिपरीत पोलीस वर्धापन सप्ताहनिमित्त क्रिकेट सामना रंगला

क्रिकेट सामन्यात पोलीस संघ विजयी.

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)

पोलीस वर्धापण सप्ताहानिमित्त क्रीडा संकुल येथे क्रिकेटचा सामना रंगला दरम्यान ठाणेदार संदीप धोबे यांनी टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 15 षटकाच्या सामन्यात 140 धावांचे लक्ष ठेवले. उत्तम बल्लेबाजी करीत ठाणेदारानी संघाला विजयासाठी सक्षम बनविले. गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी करीत विरोधी संघाला पूर्णबाद करीत पोलीस संघ सरस ठरला. यादरम्यान शारीरिक कवायत तसेच शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी समाजात करावयाच्या कर्तव्याची जाण ठाणेदार संदीप धोबे यांनी करून दिली. गोंडपिपरी पोलीस स्टेशन मार्फत पोलीस वर्धापन सप्ताहाच्या निमित्ताने खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात विविध विभागातील कर्मचारी, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी, इच्छुक खेळाडू उपस्थितांना सायबर क्राईम, मुला–मुलींवर होणारे अत्याचार व सुरक्षितता याबाबत ठाणेदार संदीप धोबे यांनी मार्गदर्शन केले. वाहतुकीचे नियम या संदर्भात मनोहर मत्ते यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी अजित जैन, विनोद लभाने, नितेश डोंगरे, अमोल दुर्योधन, लिंगलवार सर, राजूरकर सर, हिच्यामी सर,नैताम सर, अनिकेत ढमढेरे, स्नेहल फुलझेले,राहील शेख, विवेक राणा तसेच पोउपनी पटले,विलास जाधव,अनिल चव्हान, सत्यवान सुरपाम,गणेश पोदाळी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here