काँग्रेसच्या राजुरा तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षाला काँग्रेस कडून डच्चू

0
522

काँग्रेसच्या राजुरा तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षाला काँग्रेस कडून डच्चू

राजुरा प्रतिनिधी | अमोल राऊत
बामनवाडा ग्रामपंचायत च्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून राजेश चौधरी उभे होते निवडणुकीत त्यांचा विजय झालेला होता आणि ते सरपंचही झाले होते आपला सरपंचपद पाच वर्ष कायम ठेवत ते काँग्रेसच्या राजुरा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्षही होते.

तालुक्यातील काँग्रेसच्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष असताना या निवडणुकीत राजेश चौधरी यांना काँग्रेस कडून डच्चू देण्यात आला यामुळे राजेश चौधरी यांनी बामणवाडा येथील वार्ड नंबर 3 मधून उभे असलेले काँग्रेस समर्थित उमेदवार प्रफुल चौधरी यांचे विरोधात उमेदवारी दाखल केली काँग्रेसचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष असलेले राजेश चौधरी हे काँग्रेस समर्थित उमेदवाराच्या विरोधात उभे आहेत यामुळे काँग्रेस समर्थीत उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत.

राजेश चौधरी वार्ड नंबर 3 मधून निवडून येण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे वार्ड नंबर 3 मधील मतदार वर्ग एकत्रित येऊन राजेश चौधरी, अर्चना नैताम, समीक्षा झाडे यांना निवडून देण्याचा निर्णय घेतला असून निवडून देणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षांवर खरे उतरणार अशी ग्वाहीही राजेश चौधरी यांनी वार्ड नंबर 3 मधील मतदारांना दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here