वाॅरियर ड्रिम सिरीज तर्फे किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

0
450

वाॅरियर ड्रिम सिरीज तर्फे किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन

 

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
जवाहरलाल नेहरू पोर्ट टाऊनशीप (जे एन पी टी) येथे वाॅरियर ड्रिम सिरीज यांनी आयोजित केलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत इनक्रेडिबल मार्शल आर्ट अकॅडेमी च्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्या मध्ये ईतर जिल्ह्यातूनही खेळाडूंनी भाग घेतला होता. ह्या खेळातून खेळाडूंचा मानसिक व शारीरिक भागांचा पुर्णपणे विकास होतो. हे ह्या किक बॉक्सिंग च्या खेळाडूंनी आपल्या खेळातून प्रात्यक्षिक रित्या दाखवले. हा खेळ जेवढा बघण्यासाठी थरारक वाटतो तेवढाच खेळाडूंचा आत्मविश्वास सुद्धा वाढवतो कारण ह्या खेळात मानसिक व शारीरिक गोष्टींचा योग्य वापर करून स्वताला त्यात समावेश करतो. स्वरक्षण करण्याचा आत्मविश्वास अशा प्रकारच्या खेळातून येऊ शकतो हे ह्या खेळाडूंनी दाखवले आहे. त्या मध्ये त्यांना संघ प्रशिक्षक संदीप शिवतरकर, सुनील झगडे व प्रितेश शिगवण यांनी मार्गदर्शन केले. सुवर्णपदक विजेते खेळाडू मध्ये गणेश गुरव, श्री देसाई, मयुरेश खवळे होते तर रौप्य पदक खेळाडू मध्ये प्रसाद आरोलकर, सुशांत कोतावडेकर, यश खोपकर, जिगनेश खोपकर, तनया हळणकर, ईश्वरी घामणकर, जितेश कांबळे हे विजयी ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here