रामपूर आणि सास्ती ग्रामपंचायतीत उपसरपंच निवडणूकीत शेतकरी संघटनेचे उमेदवार विजयी

0
224

रामपूर आणि सास्ती ग्रामपंचायतीत उपसरपंच निवडणूकीत शेतकरी संघटनेचे उमेदवार विजयी

 

 

राजुरा, ता.प्र. – राजुरा तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र समजल्या जाणाऱ्या दोन मोठ्या ग्रामपंचायत रामपूर आणि सास्ती येथे शेतकरी संघटनेचे उपसरपंच विजयी झाले आहेत. रामपूर येथे शेतकरी संघटनेचे राहुल बानकर यांनी आठ मते मिळवून विजय संपादन केला तर सास्ती येथे शेतकरी संघटनेचे सचिन कुडे यांनी आठ मते प्राप्त करीत विरोधी उमेदवाराचा पराभव केला.

 

आज दिनांक 4 डिसेंबर ला ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक झाली. यासाठी विरोधी पक्षाकडून उमेदवारी अर्ज सादर झाल्याने निवडणूक झाली. मात्र दोन्ही ठीकाणी शेतकरी संघटनेचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले. विजयी उमेदवारांचे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, रमेश नळे, शेषराव बोंडे, दिलीप देठे, शामराव काटवले, मनोज उरकुडे, रमेश गौरकार, गरीबभाई चौधरी, मारोती गव्हाणे, प्रभाकर लडके, रामपूर येथील शेतकरी संघटना – शिवसेना ( उबाठा ) युतीचे बबन उरकुडे, सरपंंच निकीता रमेश झाडे, सुनिल नळे, वैशाली लांडे, रेखा आत्राम, संंतोषी दुधे, अतुल खनके, मंजुषा लांडे, सास्ती येथील शेतकरी संघटना – भाजप युतीचे प्रमुख मधुकर नरड, सरपंंच सुजाता अश्विन माऊलीकर, मारोती लांडे, भाऊराव कोंडेकर, आनंद लांडे, किशोर डेरकर, सागर तोटावार, दिपक डेरकर, गजानन भोगेकर यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here