बी एस एन एल ने गमवले ऑगस्ट मध्ये ५ लाख ६७ हजार ग्राहक… दूरसंचार नियामक आयोग चा अहवाल प्रसिद्ध

0
628

बी एस एन एल ने गमवले ऑगस्ट मध्ये ५ लाख ६७ हजार ग्राहक… दूरसंचार नियामक आयोग चा अहवाल प्रसिद्ध

 

अहमदनगर

संगमनेर
(ज्ञानेश्वर गायकर पाटील)
संगमनेर , २०/१०/२०२२

भारतीय दूरसंचार नियमक आयोगाने काल व्हीलआर डाटा प्रसिद्ध करून मोबाईल व टेलिफोन बाबत ची काही आकडेवारी प्रसिद्ध केली असून ,जिओ भारतीय मार्केट मोठ्या प्रमाणात काबीज केल्याचे आढळून आले आहे. ऑगस्ट मध्ये एकट्या जिओ ने ३२,८१,६९९ नव्याने ग्राहक जोडले असून , ३६.४६% भारतीय बाजारात सर्वाधिक हिस्सा नोंदवला आहे. त्या खालोखाल एअर टेल ने 3,26,205 ग्राहक नोंदवित ३१.६६% भागीदारी राखली असून, व्होडा आयडिया ने २२.०३% मार्केट शेअर राखत १,९५,८३५ ग्राहक गमवले आहेत, तर बाजारातील बी एस एन एल ह्या सरकारी कंपनीची एकूण भागीदारी ९.५८% असून ,५ लाख ६७ हजार ६३४ ची ग्राहक घसरन झाली आहे.

भारतीय दूरसंचार बाजारपेठ ९०.१७% भागीदारी खाजगी चालकांनी व्यापली असून, ९.८३% सरकारी उद्योगांच्या ताब्यात आहे. जगातील दोन नंबरचे मोबाईल ग्राहक भारतात असून,८५.१५% सध्या भारतीय टेलिफोन घनता आहे.यात मोबाइल ची घनता 83.27% तर वायर लाईन ची 1.88% आहे. साधारणतः 64801 करोड चे उत्पन्न व चलन बाजारात फिरत असते.

भारताचा अर्धा हिस्सा रिलायन्स इंडस्ट्रीज ने दूरसंचार बाबत ताब्यात घेतला आहे 52.31% हिस्सेदारी वायर व वायरलेस मध्ये प्रस्थापित केली आहे. सरकारी कंपन्या 3.17 टक्यात दिसतात.

ब्रॉडबँड मध्ये ही जिओ ने बाजी मारली असून पाठोपाठ भारती एअर टेल तर नंतर बी एस एन एल मार्केट मध्ये आहे. जिओ ने 6.56 मिलियन , भारतीने 5.13,तर बी एस एन एल ने 3.88 मिलियन जोडण्या दिल्या आहेत.

शहर व ग्रामीण असा अभ्यास केला असता , शहर भागात वायरलेस च्या 627.09 मिलियन जोडण्या दिल्या वायर लाईन मध्ये 23.98 मिलियन जोडण्या दिल्या गेल्या ,तर ग्रामीण भागात 522 मिलियन वायरलेस ,तर 1.99 मिलियन वायर लाईन जोडण्या दिल्या आहेत. ब्रॉडबँड ची संख्या वायरलेस मध्ये 783.37मिलियन असून वायर लाईन मध्ये 30.37 मिलियन आहे . 11.35 मिलियन ग्राहक या महिन्यात एम एन पी ने इतरत्र जोडले गेले असल्याचे नमूद केले आहे.
वायर लाईन मध्ये 25.63 मिलियन वरून 25.97 मिलियन कडे भारताने झेप घेतली असून 0.34 मिलियन यात वाढ झाली आहे.साधारण जोडण्या देण्याचा मासिक वाढ 1.34% आहे.बी एस एन एल चा एक वेळ मक्तेदारी असलेले वायर लाईन चा मार्केट शेअर 37.48% वर आला असून , ही एक चिंतेची बाब नक्कीच आहे.

ग्रामीण भागात जोडण्याचा वेग 92.35% असून ग्रामीण भागात तो अवघा 7.65% आहे. बी एस एन एल ला ग्रामीण भागात विस्तार करण्यास मोठी संधी असून ,या संधीचा फायदा बी एस एन एल ने घेतल्यास अद्याप ही 14% मार्केट बी एस एन एल काबीज करून , 25% पेक्षा जास्त भागीदारी बी एस एन एल भारतीय दूरसंचार बाजारात आणू शकते.
ग्राहक वाढ मध्ये, पंजाब, यूपी पछिम ,हिमाचल, महाराष्ट्र, गुजराथ. केरळ, तामिळनाडू, कलकत्ता, व हरियाणा सर्कल आघाडीवर आहेत.

बी एस एन एल का गमावत आहे जोडण्या…
बी एस एन एल ची आर्थिक स्थिती जी खालवली आहे ,त्यास पूर्णपणे सरकारी निती जबाबदार असून, बी एस एन एल ला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण करण्यास भारतीय भांडवलदार यांना यश मिळाले आहे. खाजगी दूरसंचार कंपन्यांचे 5 जी बाजारात उपलब्ध झाले असून ,सरकारी कंपन्या अद्याप ही 2 जी मध्येच आहेत, तर क्वचित ठिकाणी 3 जी आहे. जिओ ने ग्रामीण भागात ही मजबूत पाया करण्याचा संकल्प केला असून , अनेक गावात सध्या त्यांचे काम जोरात चालू असून ,ग्रामीण भागात विस्तार केला तर काही दिवसात जिओ ची भारतीय भागीदारी सुमारे 75% बाजारात असेल. बी एस एन एल ची स्थिती अजून ही धोक्यात असून,ग्रामीण भागात विस्तार करण्यास मोठी संधी आहे. सरकारने काही बाबी विचारात घेऊन बी एस एन एल बाबत चांगले धोरण आखणे गरजेचे आहे. आज ही बी एस एन एल कडे इतर सर्व कंपन्या पेक्षा जास्त मनुष्य बळ उपलब्ध असून, ह्या मनुष्यबळाचा वापर फिल्ड वर मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. ठेकेदारी पद्धतीने बी एस एन एल अपंग तर होत नाही ना? या कडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. काही ही असो , पाच लाख ग्राहक पुन्हा मिळवण्यास बी एस एन एल ला मोठा संघर्ष करावा लागेल. दिवसेदिवस अशीच स्थिती राहिली तर अनेकांच्या भवितव्याचा ही प्रश्न उभा राहील, कारण ग्रामीण भागात, तळागाळात , संकट समयी बी एस एन एल ची गरज भासते ,नाही तर आज स्वस्त वाटणारी ही सेवा उद्या खाजगी कंपन्या माजोरी होऊन भरमसाठ वाढ करतील . जनते मधून ही बी एस एन एल ला पाठिंबा मिळाला पाहिजे, पण तितकीच गुणवत्ता बी एस एन एल ने दाखवली पाहिजे. प्रतेक घरात किमान एक तरी सिम बी एस एन एल चे आवश्यक आहे. याचा प्रचार ही कर्मचारी , अधिकारी यांनी केला पाहिजे. कर्मचारी ताकद मोठी असते , ती त्यांनी वापरली पाहिजे. पण दिवसेंदिवस घटत राहणारे बी एस एन एल नक्कीच चिंता करण्या सारखं आहे.
ज्ञानेश्वर गायकर
dmgaykar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here