गावांत शासकीय सेवेत सामाविष्ट झालेल्या विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ

0
535

गावांत शासकीय सेवेत सामाविष्ट झालेल्या विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा सत्कार समारंभ
विहीरगांव/अमोल राऊत । ग्रा.पं विहीरगांव व गांवच्या युवकांच्या वतीने आज दि.२२ मार्च २०२१ रोजी शासकीय सेवेत समाविष्ट झालेल्या विद्यार्थीचा उज्वल यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यशस्वी विद्यार्थी दिपक खेडेकर हे पुढील काळात सीमा सुरक्षा बल मध्ये देश सेवा बजावणार आहे. तसेच गावांतील सार्वजनिक वाचनालयाला सहकार्य केलेले वानखेडे सर यांना व दिपक खेडेकर यांना श्रीफळ व साल देऊन सत्कार करण्यात आला. आपल्याला आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळणे आवश्यक अाहे.वाचनालयाला भेट वस्तू देऊन आजही विद्यार्थीसाठी त्यांच्यात आपुलकीची भावना आहे हे वानखेडे सरांनी या माध्यमातून स्पष्ट केले. चांगले विचार व व्यक्तिमत्त्व एक आयुष्याची हीच खरी शिदोरी असते.हे सरांनी समाजाला दाखवून दिले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे नवनिर्वाचित सरपंच रामभाऊ देवईकर मार्गदर्शक म्हणून प्रा.लोहे सर व गावंचे उपसरपंच निलकंठजी खेडेकर सत्कार मूर्ती दिपक खेडेकर,वानखेडे सर व प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.पं. सदस्य माधुरी चिडे, पुजा वाघमारे, प्रेमलता बोढे, माजी सरपंच सुरेशजी आस्वले,तसेच माजी उपसरपंच ईशाद शेख, सचिन बोढे (पोलीस पाटील), शुभम वाघमारे, ग्रामसेवक सुर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक गणेश चंदनखेङे यांनी केले.कार्यक्रमाचे सुञ संचालन मनिषा धवणे शिक्षिका जि.प.प्रा.शाळा विहीरगांव व आभार प्रदर्शन जि.प. प्रा.शाळा विहीरगांवचे शिक्षक याेगेश कोडापे यांनी केले. तसेच सत्कार समारंभ कार्यक्रम उपस्थितीमध्ये वाचनालयातील विद्यार्थी निखिल सुपारे, अक्षय बोळे, राजकुमार वांढरे, आशिष बोबडे, स्वेता येरेवार, मयुर वांढरे, कल्याणी वांढरे,निकिता साळवे, पायल येरेवार, पायल बोधे, ममता काळे यादी उपस्थित होते. हा कार्यक्रम निश्चित गावांतील शासकीय सेवेत जाणाऱ्या विद्यार्थीसाठी प्रेरणादायी ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here