त्या घटनेची निष्पक्षपाती चाैकशी करुन पीडीत कुटुंबाला न्याय द्यावा गडचिराेली संविधान बचाव आंदाेलनाची मागणी!
किरण घाटे

गडचिराेली । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मीकी या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणाची निपक्षपातीपणे चाैकशी करुन पीडीत कुटुंबाला न्याय देण्यांत यावा अशी मागणी गडचिराेलीचे जिल्हाधिकारी यांचे कडे संविधान बचाव आंदोलन समिती व्दारे एका लेखी निवेदनातुन नुकतीच करण्यांत आली . उत्तर प्रदेशात दिवसेंगणिक महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढ हाेत असुन गुन्हेगारीवर अंकुश बसण्यांसाठी अश्या प्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कारवाई हाेणे हे अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे . असे निवेदनात प्रामुख्याने नमुद करण्यात आले आहे .
जिल्हाधिका-यांना निवेदन देते वेळी संविधान बचाव आंदाेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता संदेश भालेकर, उपाध्यक्ष मेघराज राऊत, बहुजन कर्मचारी अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष डाँ .नामदेव खाेब्रागडे , व इत्तर विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.