मुलींनो कलेक्टर बनण्याची स्वप्न पहा – ऍड. एम. बी. चव्हाण

0
370

मुलींनो कलेक्टर बनण्याची स्वप्न पहा – ऍड. एम. बी. चव्हाण

 

 

आर्णी : आज दत्त प्रासादिक शिक्षण संस्था आर्णी द्वारा संचालित, श्री. म. द.भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात “एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करिअरच्या संधी आणि वाटा या विषयावर चर्चासत्र आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक ऍड. श्री. एम. डी.चव्हाण सर – तालुका दिवानी व फौजदारी न्यायालय आर्णी, प्रमुख वक्ते श्री. नाईक सर – संचालक, एमबिशन स्पर्धा परीक्षा क्लासेस आर्णी, प्रा. संदीप भगत सर – संचालक, यश अकॅडमी आर्णी. प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या स्थानिक संस्थेच्या संचालिका सौ. आशाताई भारती मॅडम उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य श्री. रवीशेखर कोटावार सर, पर्यवेक्षक श्री. प्रेमकुमार नळे सर, प्रा. सुभाष जाधव सर, प्रा. उमेश मोकळे सर, प्रा. कू. भाग्यश्री जाधव मॅडम, प्रा. प्रफुल मेहर सर आणि वर्ग अकरावी व बारावी कला व वाणिज्य शाखेच्या जवळपास २०० च्या वर विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. मनोज सहारे सर यांनी केले. व आभार प्रा. प्रफुल मेहर सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here