भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व विविध उपक्रमांचे आयोजन

0
430

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व विविध उपक्रमांचे आयोजन

 

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
मंगळवार दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता ते दुपारी २ वाजेपर्यंत दूधवाला चाळ क्र.२, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई येथे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वडाळा विधानसभा प्रभाग क्र. १९२ च्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विभागातील जनतेने अतिउत्सहाने प्रतिसाद दिला. ह्या उपक्रमाला अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले. कार्यसम्राट आमदार कालिदास कोळंबकर यांनी उदघाटन केले.


सदर कार्यक्रमात एकनाथ संगम, दादा शिरसेकर, जयंत नटे, संदीप तिवरेकर, शैलेश यादव, आदर्श दुबे, राजीव सावला, यश विलणकर, राजेश धस, अमोल मोहिते, दीपक ढवण, दिनेश झिमुर, रवींद्र गणापुरा, सुर्या बिल्ला, ओमकार गुरव, राजेश जाधव, संतोष शिंदे, निलेश कदम, विकी कांबळे, ओमकार पाटील, धोंडीराम पंडे, अरुण कदम, विष्णू सोनावणे, सुहास कांबळे, सुरेश पाटील, डॉमनिक, रत्नाकर पताडे, राहुल गुप्ता, राजेंद्र शिंदे, प्रमोद सावंत, बाळा हरेरे, राजेश सोडये, महेश कदम (पत्रकार) व जितेंद्र विष्णू कांबळे (वडाळा विधानसभाचे उपाध्यक्ष) सह भाजपचे अनेक मान्यवरांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here