१०८ अॅंम्बूलंन्सच्या वाहन चालकाचा काेराेना याेद्धा म्हणून सत्कार

0
541

१०८ अॅंम्बूलंन्सच्या वाहन चालकाचा काेराेना याेद्धा म्हणून  सत्कार

 

पाेंभूर्णा :-
काेराेना विषाणू संसर्गाशी संपुर्ण भारत एकजुट होऊन लढत आहे. अश्या कठिन प्रसंगी डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पाेलिस, स्थानीक प्रशासन आपला भरीव याेगदान देत आहेत. अश्यातच काेविडच्या या लढ्यात १०८ अॅम्बूलंन्सवर वाहन चालक म्हणून जबाबदारीचे काम करीत आहेत. काेराेना महामारीच्या या लढ्यात वाहन चालकाचा माेठा वाटा आहे. अश्या कठिन प्रसंगी जबाबदारीने अतुलनीय सेवाकार्य केल्याबद्दल १०८ च्या अॅम्बूलंन्सवर कार्यरत असलेले वाहन चालक अनुराग जुवारे, सचिन दुम्मेवार, उमेश गाेलगाेंडावार, व पर्यवेक्षक सचिन चलकलवार, यांचा पाेंभूर्णा तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालया तर्फे काेराेना याेद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.

यावेळी पंचायत समितिच्या सभापती अल्का आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहुल संताेषवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदेश मामिडवार, पाेंभूर्णा प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रतिक गाेजे उपस्थित हाेते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here