आजपासून नामदेव रोकडे महाराज पुण्यतिथी

0
470

आजपासून नामदेव रोकडे महाराज पुण्यतिथी

आजनगाव येथे दोन दिवसीय महोत्सव; भाविकांनी कोरोनाचे नियम पाळीत उपस्थित राहण्याचे आव्हान

 

राजुरा : घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी परमपूज्य नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहात हजारो भक्तगणाच्या उपस्थितीत साजरा होत होता. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटकाळात नामदेव महाराजांची पावन भूमी व भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आजनगाव (तह. वरोरा) येथिल मठाच्या दर्शनाला मुकावे लागले. मात्र नुकतेच शासनाने शिथिल केलेल्या नियमानुसार कोव्हिड-१९ चे नियम पाळीत यावर्षी पुण्यतिथी महोत्सव आज दिनांक ८ व ९ तारखेला साजरा होत आहे.

सकाळी घटस्थापना करून हरिपाठ व सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम असून उद्या सकाळी दिंडी सोहळा दुपारी काल्याचे कीर्तन त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले असून सोहळ्यात उपस्थित भक्तांनी कोव्हिड-१९ नियमांचे पालन करीत उपस्थित राहण्याचे आव्हान देवस्थान कमिटीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here