पुरामुळे वर्धा नदी पुलावर अडकले इसमाचे शव

0
1359

पुरामुळे वर्धा नदी पुलावर अडकले इसमाचे शव

 

गोंडपिपरी, 16 सप्टें. : गोंडपिपरी व राजुरा तालुक्याला जोडणाऱ्या आर्वी येथील वर्धा नदीच्या पुलावर आज पूर ओसरल्यानंतर पुलाच्या खांबांना अडकुन फुगलेल्या स्थितीत एका इसमाचे शव आढळून आले. याची माहिती उपपोलिस ठाणे लाठी यांना मिळताच ठाणेदार घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

मृतकाचे नाव गंगाधर रामचंद्र मोरे (वय 72 वर्ष) असे असून ते कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. सदर मृतकांचे नातेवाईक तीन मुले, दोन नातू व भाऊ घटनास्थळी येऊन शवाची ओळख पटविली. सदर मृतक मंगळवार रात्रीपासून घरून बेपत्ता होता. आज वर्धा नदीचा पूर ओसरल्यानंतर वर्धा नदीच्या पुलावर लोखंडी खांबांना सदर शव अडकलेल्या स्थितीत आढळून आले. वृत्त लिहितोस्तवर सदर इसमाच्या उत्तरीय तपासणीसाठी गोंडपिपरी येथील वैद्यकीय चमू घटनास्थळी दाखल झाली होती.

यावेळी घटनास्थळी उपपोलिस स्टेशन लाठीचे ठाणेदार मनोहर एम. मोगरे, पोहवा सुनील राऊत, प्रवीण आसुटकर, स्वप्नील चव्हाण, ऋषभ कातकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here