नवी मुंबईच्या चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण

0
513

नवी मुंबईच्या चर्चमधील लैंगिक शोषण प्रकरण

बेकायदेशीर चर्चवरील ट्रस्टी मंडळी मोकाट

 

 

स्प्राऊट्स Followup

महाराष्ट्रामधील नवी मुंबई विभागातील सीवूड या शहरात काही मुलींचे लैंगिक शिक्षण झाले. मात्र या स्कॅण्डलमध्ये यापूर्वीही अनेक महिलांचे शोषण झाले असण्याची शक्यता आहे, मात्र पोलीस हे प्रकरण ‘दडपण्याचा’ प्रयत्न करत आहे, असा संशय स्थानिक नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमशी बोलताना व्यक्त केली आहे.

सीवूड येथे ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या मालकीचे चर्च आहे. हा ट्रस्ट बेकायदेशीर आहे, ट्रस्टच्यावतीने चर्च बांधण्यात आले आहे. या चर्चच्यावतीने बेकायदेशीर बालवस्तीगृह चालविण्यात येते. या बालविकास केंद्रामधून ४ नाबालिक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार करण्यात आली. या आधारे महिला व बालविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी सीवूड येथील ‘एनआरआय’ पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता.

याप्रकरणी मुख्य आरोपी पास्टर राजकुमार येसूदासन याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व नंतर त्याला अटक करण्यात आली. मात्र या मुख्य आरोपीबरोबर असणारे ट्रस्टी मंडळी मात्र आजही उजळ माथ्याने फिरत आहे. वास्तविक याप्रकरणी या सर्वच ट्रस्टी मंडळींची नार्को टेस्ट करण्यात यायला हवी.

ही ट्रस्टी मंडळी बालवस्तीगृहात मुलं कुठून आणायची, कोणत्या संस्था या बालवस्तीगृहाला मुलं पुरवायच्या, या संस्थांचे संस्थाचालक व ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’वरील संचालक मंडळ या सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी.

पोलीस या प्रकरणाचा तपास अत्यंत संथ गतीने करीत आहे, त्यामुळे इतर संशयित आरोपी या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता वाढत आहे.

सर्व राजकीय पक्षांमधील महिलांच्या प्रतिनिधी या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहेत. या बालवस्तीगृहात सध्या व यापूर्वीही नाबालिक, मतिमंद, गतिमंद मुली राहत होत्या. यापैकी काही मुली ताबडतोब बालवस्तीगृह सोडून जायच्या, या सर्व मुलींचा शोध घेवून त्यांचे समुपदेशन व्हायला हवे, व त्यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी.

हे प्रकरण वरकरणी वाटते, इतके छोटे नाही. यातील नाबालिक पीडित मुलींचे मोठ्या प्रमाणात शोषण झाले असण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आल्यास अनेक कथित नराधमांचे बुरखे फाटण्याची शक्यता आहे.

ही संस्था नोंदणीकृत नाही म्हणजेच बेकायदेशीर आहे. तरीही इतक्या मोठ्या संख्येने मुलं कुठून आणली, याची माहिती व त्यासंबंधीची कोणतीही कागदपत्रे या संस्थेकडे उपलब्ध नाहीत, हे सर्व अत्यंत संशयास्पद आहे. तरीही हे प्रकरण ‘ दडपण्याकडे’ पोलिसांचा कल आहे, हे आढळून येते.

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

सहकार्य: उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स ब्रँड स्टोरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here