शहरातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करा…!

0
494

शहरातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त करा…!

माजी नगरसेविका उज्ज्वला जयपूरकर यांची मागणी

 

राजुरा : शहरामध्ये मोकाट जनावरे यांनी नुसता उच्छाद मांडला आहे. अंगणातील झाडे, रोपटे गाई, बकऱ्या येवून खावून जातात. रस्त्यावर, घरासमोर, कुठेही घाण करून ठेवतात. आताचे शेण इतके दुर्गंधी असते की त्याला उचलण्याची हिम्मत होत नाही. परंतु महिलांना ते करावेच लागते. तसेच कुत्रे गल्लोगल्ली फिरत असतात त्याचा ही त्रास होतो. ही कुत्री रस्त्यावर आडवी उभी धावत असतात यामुळे अपघात होण्यासही आमंत्रण मिळत आहे. तसेच बाहेर अंगणात लहान मुले खेळत असल्याने त्यांना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाकडे गंभीरतेने लक्ष घालुन योग्य बंदोबस्त करण्यात यावा. याकरिता प्रभाग क्रमांक 1 किसान वॉर्ड, देशपांडे वाडी राजुरा च्या माजी नगरसेविका उज्वला जयपूरकर यांनी आज नगर परिषदेला मोकाट जनावरे व कुत्री यांचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here