मराठी माणसांशी नाद करू नका, अन्यथा सळो की पळो करून सोडू

0
469

मराठी माणसांशी नाद करू नका, अन्यथा सळो की पळो करून सोडू

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचा राज्यपालांना इशारा

चंद्रपूर:-  महामहिम राज्यपाल हे संविधानिक पद आहे. राज्यपालांनी राज्याची जबाबदारी पालक या नात्याने कुठलाही आकस न ठेवता पार पाडायची असते. राज्यपाल मात्र, पक्षपातीपणे काम करतात, वादग्रस्त विधान करतात. त्यांनी आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा, अन्यथा सळो की पळो करून सोडू, असा इशारा चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं. त्यावर काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी खरपूस समाचार घेतला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना धानोरकर म्हणाले, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे.  हे मराठी माणसाचं राज्य आहे, हे राज्यपालांनी लक्षात ठेवाव. ज्या दिवशी मराठी माणूस आणि छत्रपती शिवरायांचे मावळे उतरले ना, त्या राज्यपालाना सळो की पळो करून सोडतील. आज हे झाले रिकामी झालेले, ज्या भागांमध्ये यांना कोणी विचारत नाही, उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री म्हणून निवृत्त झालेल्या भगतसिंग कोशारीना त्यांच पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्रमध्ये त्यांना राज्यपाल बनवून पाठविण्यात आले. महाराष्ट्र हे आमच्या मराठी माणसांनी तयार केलेले, उगीच नाद करायची अजिबात गरज नाही, अशा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here