नेचर फाऊंडेशन च्या भीसी येथील सनशाईन शाळेचे उदघाटन संपन्न

0
470

नेचर फाऊंडेशन च्या भीसी येथील सनशाईन शाळेचे उदघाटन संपन्न

 

 

चिमूर/तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील भीसी येथे नेचर फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाच्या पाया मजबूत करण्यासाठी द सनशाईन प्री इंटरनॅशनल शाळेची स्थापना करण्यात आली नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या शाळेचं उद्घाटन करण्यात आलं.

या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून माजी राज्यमंत्री रमेशकुमार गजभे तर प्रमुख अतिथी म्हणून संविधान अभ्यासक प्रा.भगवान नन्नावरे, माजी जिप सदस्य ममता डुकरे, सामाजिक कार्यकर्ते किशोर मुंगले, वरिष्ठ पत्रकार पंकज मिश्रा, मॅजिक उपक्रमाचे श्रीकांत एकुडे, वाल्मिक नन्नावरे, नितेश दोडके, मनी रॉय, नेचर फाउंडेशन चे सचिव निलेश नन्नावरे, शुभम मंडपे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नेचर फाउंडेशन च्या वतीने सुरू असलेल्या समाजपयोगी कार्याची व उपक्रमाची या वेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा खोब्रागडे, प्रास्ताविक निलेश नन्नावरे तर आभार स्नेहा फटिंग यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूजा चाफले, काजल सावसाकडे, राणी चौधरी, पूजा बारेकर, गुंजन सावसाकडे, अमर ठवरे, अमोल कावरे, प्रदीप मेश्राम आदींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here