बिबटच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 वर्षीय मुलीची भेट घेत यंग चांदा ब्रिगेडने केली आर्थिक मदत

0
501

बिबटच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 4 वर्षीय मुलीची भेट घेत यंग चांदा ब्रिगेडने केली आर्थिक मदत

 

घरात शिरुन बिबटने केलेल्या हल्यात दुर्गापुर येथील 4 वर्षीय चिमुकली जखमी झाली होती. आज यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने सदर मुलीसह तिच्या कुटुंबीयांची भेट घेत मुलीच्या उपचारा करिता आर्थिक मदत केली आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या सायली येरणे, सविता दंडारे, नंदा पंधरे, कौसर खान, आशा देशमुख, शमा काजी, माधुरी निवलकर, वंदना हजारे, भाग्यश्री हांडे, आदिंची उपस्थिती होती.

 

मागील आठवड्यात दुर्गापूर येथील आदिवासी आश्रम शाळेजवळील रहिवासी असलेल्या जगजिवन कोपलवार यांच्या चार वर्षीय मुलीवर बिबटने घरात शिरुन हल्ला केला होता. यावेळी जगजिवन यांच्या पत्नीने मुलीला वाचविण्यासाठी बिबटला काठीने मारले. नंतर बिबटने तेथुन पळ काढला. मात्र या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने कोपलवार यांच्या घरी जावून जखमी मुलीच्या प्रकृतीची विचारणा केली. यावेळी तिच्या पूढील उपचारा करिता आर्थिक मदतही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच शासनातर्फेही सदर मुलीला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here