राज्य महामार्गावरील भिषण अपघातात युवा प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू

0
904

राज्य महामार्गावरील भिषण अपघातात युवा प्राध्यापिकेचा जागीच मृत्यू

कारच्या धडकेत दुचाकी चक्काचूर प्राध्यापिका वनिता चिडे कालवश तर बंधु विठ्ठल गोरे गंभीर जखमी

 

 

 

कोरपना/प्रतिनिधी : तेलंगणाच्या आदिलाबाद पर्यंत जाणारा राज्य महामार्ग अपघातांचे केंद्रबिंदू ठरत असून त्यातल्यात्यात शेवटचा तालुका असलेल्या कोरपना परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. काल सायंकाळी जवळपास 6:30 वाजता तालुक्यातील सोनुर्ली जवळ एका कार ने दुचाकीला दिलेल्या धडकेत राजुरा येथील भावी प्राध्यापिका वनिता चिडे ह्यांचे घटनास्थळीच निधन झाले. त्यांचा भाऊ विठ्ठल गोरे रा. घोडपेठ ता. भद्रावती हे गंभीर जखमी झाले आहे.

 

 

प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामकिसन चिडे हे आपली पत्नी वनिता तसेच साळा विठ्ठल गोरे व त्यांची पत्नी असे चौघे दोन दुचाकीने तेलंगणा राज्यातील बेला येथे लग्नाला गेले होते. लग्नानंतर राजुरा येथे परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टी एस २० ए ६८७२ क्रमांकाच्या कार ने आपल्या भावासोबत येत असलेल्या वनिता चिडे ह्यांच्या एम एच ३४ सी बी ४३९२ क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की वनिता चिडे ह्यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला असुन चालक बंधु विठ्ठल गंभीर जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले असुन त्यांच्या पायाला जबर मार लागला आहे. दुसरीकडे धडक देणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सुद्धा उलटली. कार ने तीन ते चार वेळा पलटी घेतली असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

 

 

घटनेची माहिती मिळताच कोरपनाचे ठाणेदार सदाशिव ढाकणे हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र परिस्थिती तणावाची असल्याने त्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन अखेर पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी गडचांदुर येथे हलविण्यात आला. रात्रीच शवविच्छेदन करून पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला असुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here