उद्या आवाळपूरात सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा

0
575

उद्या आवाळपूरात सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळा

 

आवारपूर : कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील बुद्ध जयंती समारोह व सिध्दार्थ बुध्द विहार लोकार्पण सोहळ्याचे उद्या दिनांक १६ मे सोमवारला आवारपूर येथील सिध्दार्थ बुध्द विहार भवनाच्या पटांगणात होत आहे.

 

या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टि.एम.साव, जि.के.उपरे, संघा साव, कविता मडावी, यशवंत कवाडे, चेतन उंदिरवाडे, किशोर सबाने, निरंजन जामगडे, चंद्रमनी धोटे, सत्यवान दिवे, दुधगवडी, ताकसांडे मँडम याची उपस्थित राहणार आहे.

सांयकाळी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायीका प्रमोदिनी साठे वर्धा यांचा बुद्ध भिम गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम धोटे, सचिव दर्शन बदरे, रमेश खाडे, प्रमोद चांदेकर, मुरलीधर वानखेडे, आई रमाई महिला मंडळाच्या शिला धोटे, चेतना खाडे, सविता बदरे, यशोधरा चांदेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here