कोठारी-काटवली-बामणी मार्गाचे बांधकाम निकृष्ट

0
553

कोठारी-काटवली-बामणी मार्गाचे बांधकाम निकृष्ट

● अवैध माती मिश्रित मुरमाचा वापर
● भिम आर्मीच्या टिमने घेतली दखल

 

 

कोठारी :- बामणी-काटवली-कोठारी या गावांना जोडणाऱ्या जिल्हा मार्गाचे रुंदीकरणासह सिमेंट काॅक्रिट व आवश्यक असलेल्या ठिकाणी बांधकाम जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अंदाजीत तिन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सदर बांधकाम नोंदणीकृत कंत्राटदाराच्या माध्यमातून होत असुन अंदाजपत्रकास केराची टोपली दाखवून अप्रक्षिशीत माणसे दावनीला जुंपुन मनमरजीने निकृष्ट दर्जाचे बांधकाम सदर विभागाच्या अभियंत्याच्या देखरेखीखाली होत असल्याचे भासविल्या जात आहे. नियोजन शुन्य बांधकामाची माहिती मिळताच भिम आर्मी ची टिम ने प्रत्यक्ष बाधकामाची पाहणी करून हि बाब उजेडात आणण्यासाठी चौकशीची मागणी केली आहे.

 

गावा-गावानां जोडणारे रस्ते निर्माण व्हावे आणि त्या गावाच्या विकासाला चालना मिळावी म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तिन कोटी रुपये खर्च करून काटवली, बामणी, कोठारी या चार किमी जिल्हा मार्गाचे काम सुरू आहे.

 

चंद्रपूर जिल्ह्यात ४५ ते ४८ डिग्री सेल्सिअस तापमानाचा पारा चढला असताना रखरखत्या ऊन्हात सिमेंट काॅक्रिट चे तथा लहान मोठ्या पुलाचे बांधकाम केल्या जात आहे. सिमेंट काॅक्रिट रोडचे बांधकाम करीत असतांना जुन्या रोडची खुदायी केलेली नाही. खडीकरण अथवा बेड काॅक्रिट न करता निखळ गिटिवर मुरमाची दबाई करून सिमेंट काॅक्रिट रोडचे निर्माण केल्या जात आहे. अभियंता बांधकामावर उपस्थित नसतांना गिटी,रेती व सिमेंटचे मिश्रण किती प्रमाणात वापरल्या गेले. ही शंकेची बाब आहे. तप्त उन्हात काम करीत असतांना सदर मिश्रणात पाणी मुबलक प्रमाणात पुरलेकी नाही शंकाच आहे. यामुळे भर उन्हात बांधकाम होत असलेला सिमेंट काॅक्रिट रोड तडकण्याची पुरणता खात्री आहे.

 

मार्गाचे रुंदीकरण केल्या जात असुन रस्त्याचे दोन्ही कडेला खोदकाम करून निकृष्ट दर्जाचा माती मिश्रित मुरमाचा वापर केल्या जात आहे. रस्त्याचे दोन्ही बाजूला खोदकाम करून पाणी मारुन रोलरणे दबाई करणे आवश्यक आहे. मात्र कंत्राटदार अंदाज पत्रकात नमूद करण्यात आल्याप्रमाणे खोदकाम करीत नाही. रस्ता मजबूती करण्यासाठी खोदलेला मलमा सद्रूश्य माती मिश्रित मुरुम रस्त्याचे कडेला टाकत असुन परत तोच मलबा खोदलेल्या ठिकाणी भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. काटवली जंगल परिसरातून मुरमाचे अवैध खोदकाम करून रस्त्याचे कामासाठी वापरल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर रस्ता बांधकामात प्रमाणबधदता आढळून येत नसल्याने भिम आर्मी च्या टिमने सदर बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

“भिम आर्मी ची टिम सुचणे नुसार रस्ता बांधकाम ठिकाणी गेली असता संबंधित बाबी निदर्शनास आल्या. निकृष्ट दर्जाचे बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत पुराव्यानिशी सैंम्पल गोडा केले असून बांधकामात प्रमाणबधदता आढळून आलेली नाही. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारास संबंधित विभागाच्या अभियंत्याचे पाठबळ मिळत आहे. तेव्हा भिम आर्मी भारत एकता मिशन, जिल्हा, तालुका, शाखेच्या वतीने निकृष्ट बांधकामाची चौकशी व अवैध मुरमाच्या वापरावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत असुन कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे व अभियंत्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा भिम आर्मी च्या वतीने येत्या सात दिवसात आंदोलन करुन काम बंद पाळण्यात येईल.”

जिल्हा अध्यक्ष- सुरेंद्र रायपुरे
जिल्हा सचिव- राज जुनघरे
भिम आर्मी चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here