घुग्घुस शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, जय भीमच्या घोषणांनी गुंजले शहर

0
407

घुग्घुस शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी, जय भीमच्या घोषणांनी गुंजले शहर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घुग्घुस शहरातील वार्ड, वार्डातील सकाळी बौध्द विहारत डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक बौध्द वंदना घेऊन उत्साहात साजरी करण्यात आले.
तसेच सायंकाळला वार्ड, वार्डातुन शोभायात्रा, रॅली काढण्यात आली. सर्व रॅली पंचशील चौक भारतीय बौध्द महसभा नगर शाखा येथे एकत्रित येऊन गांधी चौकच्या मार्गाने तहसील कार्यालयासमोर पूर्णाकृती पुतळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्रित होऊन सामूहिक बौध्द वंदना घेण्यात आले.
रॅली मध्ये जय भीमचा नारा देत, निळे झेंडे घेवून, गाजा- बाजा, संदल सर्व धर्म समभाव मिरवणूक होऊन शोभायात्रा काढण्यात आली. तसेच सर्व राजकीय पक्षाचे व सामाजिक संघटने द्वारे शीतपेय व भोजनाचे स्टाल आवण्यात आले.
यावेळी तहसिल कार्यालयासमोर पृर्णाकृती पुतळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिसरातील एकत्रित झालेले लोकांना नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समितीतर्फे व्यवस्थापन करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here