डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रज्ञा, शील, करुणेचा महासागर !

0
570
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रज्ञा, शील, करुणेचा महासागर !
 
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे प्रतिपादन 
चंद्रपूर : बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांच्या प्रज्ञा, शील आणि करुणा या तत्वांशी आयुष्यभर बांधील राहून रूढी- परंपरावादी व्यवस्थेच्या विरुद्ध मोठा संघर्ष केला. स्वातंत्र्योत्तर भारताची लोकशाहीवादी, प्रजासत्ताक, सार्वभौम अशी आधुनिक ओळख जगाच्या पटलावर निर्माण करून देणारे बाबासाहेब खऱ्या अर्थाने विश्व विभूती ठरतात. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारावर नव्या लोकशाहीवादी प्रजासत्ताक भारताची रचना निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.
चंदनखेडा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी प्रा. डॉ. एम. एस. वानखेडे, अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्ञानेश्वर दुर्गावार रक्षक, ग्रामपंचायत सरपंच चंदखेडा नयन बाबाराव जांभुळे, सेवानिवृत्त अधिकारी एम. एस. जांभुळे, सामाजिक कार्यकर्ते सुधीर मुंडेवार, ग्राम पंचायत उपसरपंच चंदनखेडा भारती उरकांडे, मुख्याध्यापक रिंगणे, सदानंद गबत्तनवार यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तित्व म्हणजे अथांग सागर आणि विस्तिर्ण आकाश. सामान्यतः डॉ. बाबासाहेबांची ओळख भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार आणि दलित मुक्तीचे जनक एव्हढीच करून दिल्या जाते, पण या पलीकडेसुद्धा त्यांचे प्रचंड कार्यकर्तृत्व आहे. असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here