गडचांदूर शहर संगणक व डिजिटल सेवा असोसिएशन च्या अध्यक्षपदी सतीश बेतावार व सचिवपदी सतीश सातपुते यांची निवड
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
गडचांदूर शहरातील सर्व संगणक केंद्र चालक,आपले सरकार सेवा केंद्र चालक,सीएससी केंद्र चालक व ऑनलाईन सर्व्हिसेस केंद्र चालक यांची प्रथम कार्यकारणी सभा दि.१३/०८/२०२० रोजी श्री विनोद कुमार खंडाळे यांचे अध्यक्षतेखाली ड्रीम पॉइंट कम्प्युटर,कोरपना रोड,गडचांदूर येथे संपन्न झाली सभेत गडचांदूर शहर संगणक डिजिटल सेवा असोसिएशन गठित करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली चर्चेअंती प्रथम कार्यकारिणीचे गठन करण्यात आले त्यानुसार चर्चेअंती गडचांदूर शहर संगणक व डिजिटल सेवा असोसिएशन अध्यक्षपदी सतीश बेतावर यांची सर्वसंमत्तीने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून मारुती नागपुरे व सचिव व सचिव पदी सतीश सातपुते यांची निवड करण्यात आली सहसचिव म्हणून सुनील जेऊरकर, कोषाध्यक्ष म्हणून दीपक खेकारे यांची निवड करण्यात आली असोसिएशनच्या सल्लागारपदी विनोद खंडाळे व उद्धव पुरी यांची निवड करण्यात आली त्याच प्रमाणे कार्यकारणी सदस्य म्हणून ललेन्द्र गेडाम,अब्राहम मोहीतकर, नितेश इटनकर, सचिन खैरे, सचिन धनवलकर,दर्शन कोडापे, सचिन पानघाटे,विवेकानंद परबत,सोपान खामनकर,विक्की उरकुडे,संजय गोखरे,मोहन भारती,प्रा.रवि नगराळे,पंडित गुजर,सुरेश कपले यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.