पंजाब मधील विजयानंतर गांधी चौक येथे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

0
428

पंजाब मधील विजयानंतर गांधी चौक येथे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

दिल्लीनंतर पंजाबने दाखविले आप हेच देशाचे भविष्य

 

पंजाब राज्यात आम आदमी पार्टीने प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली. या निमित्त चंद्रपूर जिल्हा आम् आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील गांधी चौक ते जटपूरा गेटपर्यत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विजयी जल्लोष साजरा केला.

मागील सुमारे 10 वर्षात आम आदमी पार्टी ने प्रगतीचा आलेख मांडला आहे. दिल्लीत दोनदा बहुमत सिद्ध करून सत्ता स्थापन केली. देशाला हेवा वाटेल असा विकास साधला. म्हणूनच आप हेच देशाचे भविष्य आहे, हे पंजाबने स्वीकारले आहे. आजचा निकाल हा भविष्याची नांदी आहे, अशी प्रतिक्रिया आप चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिली.

पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा धक्का बसला. आम आदमी पक्षानं सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. 117 मतदारसंघ असलेल्या पंजाबमध्ये आप 92 जागांवर पुढे आहे. विशेष म्हणजे आपच्या मुसंडीमुळे काँग्रेसची वाताहत होताना दिसत आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सध्या पिछाडीवर आहेत. हे दिल्ली विकासाचे गमक आहे, असे महिला अध्यक्षा एडवोकेट सुनिताताई पाटील यावेळी म्हणाल्या.

देशात भाजप प्रणित केंद्र सरकारने भ्रष्ट राजकारण केले. विकास कुठेही साधलेला नाही. देशाची सूत्रे आम आदमी पार्टीच्या हातात द्या, असेही मुसळे म्हणाले.

विजयी मिरवणूक रॅलीत चंद्रपूर शहरातील आम आदमी पार्टीच्या महिला तसेच पुरूष कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here