नगरपंचायत पोंभुर्णा च्या ठेकेदारी सफाई कामगारांना शासनाच्या विविध सुविधा लागू करा

0
467

नगरपंचायत पोंभुर्णा च्या ठेकेदारी सफाई कामगारांना शासनाच्या विविध सुविधा लागू करा

वंचित चे शहर अध्यक्ष राजु खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना निवेदन

 

पोंभुर्णा प्रतिनिधी :- नगरपंचायत पोंभुर्णा येथे मागील अनेक वर्षांपासून सफाई कामगार कार्यरत आहेत.त्यांना शासकीय नियमानुसार सुविधा देणे आवश्यक असुन ते त्यांना मिळत नाही.कामगार कायद्याप्रमाणे त्यांचे मानधन मिळायला पाहिजे पण् त्यांना तोकड्या मानधनावर बोळवण केली जाते आहे.त्यामुळे पोभुर्णा नगरपंचायत च्या ठेकेदारी सफाई कामगारांना शासकीय सुविधा लागू करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष राजु खोब्रागडे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या त्यात प्रामुख्याने नगरपंचायत पोंभुर्णा चे रोजंदारी कर्मचाऱ्यांना मंजूर आकृतीबंधनुसार उपलब्ध रिक्त पदावर कर्मचाऱ्यांच्या समावेशास प्राधान्य देण्यात यावे. सफाई कामगारांना नगरपंचायतीकडून ओळखपत्र देण्यात यावे. कामगार आयुक्त नागपूर यांचे कार्यालयीन पत्रानुसार विशेष वाढीव भत्ता अदा करण्यात यावा. रोजंदारी कामगारांचा दुर्दैवी मृत्यू व वय झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर रोजंदारी कामगार म्हणून नियुक्ती देण्यात यावी. सर्व रोजंदारी कामगारांना प्रत्येक महिन्यात वेतन स्लिप देण्यात यावी. नगर पंचायतमधील ठेका पध्दतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना शासकीय किमान वेतन देण्यात यावे.नगरपंचायत पोंभुर्णा मधील ठेका पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कामगारांना वेतन दर महिन्यात १० तारखेच्या आत देण्यात यावे. सफाई कामगारांना नियमित काम देण्यात यावे. कामगारांना कामावरून कमी करु नये. कंत्राटी कामगारांना शासकीय नियमानुसार पीएफ, ईसी सुविधा देण्यात याव्या. कंत्राटी सफाई कामगारांना नोटीस न देता कामावरुन काढू नये. कामगारांना दिवाळीत बोनस देण्यात यावे. सफाई कामगारांना १२ महिने काम द्यावे व कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्यावे, आदी मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष राजु खोब्रागडे, नगरसेवक अतुल वाकडे, अविनाश कुमार वाळके,अजय उराडे, तसेच सफाई कामगार अनिल गेडाम, मारोती जिल्हेवार, आकाश गोरंतवार,पिंटु जिल्हेवार, संजय जिल्हेवार, सुनिल गोरंतवार, अंकुश गद्देकार, देविदास ईप्पलवार,विजय ईप्पलवार,मनोज गनविर,गणेश कोडाप व सर्व सफाई कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here