दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार ; दोघे गंभीर जखमी

0
885

दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार ; दोघे गंभीर जखमी

 

नांदाफाटा: गडचांदूर कोरपना महामार्गावर दुपारच्या सुमारास नांदा फाटा येथून रमेश गुंडुरे आपल्या पत्नी आणि मुलीला घेऊन शिवरात्री निमित्य दर्शनाकरिता माणिकगड पहाडावरील जात असताना गडचांदूर कडून विरुद्ध मार्गाने येत असलेल्या हिरापूर येथील आत्राम यांच्या दुचाकीने गुंडुरे यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने रमेश गुंडुरे यांना जबर दुखापत झाली. उपचारार्थ त्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले असता दुखापत असल्या कारणाने त्यांना चंद्रपूर येथे स्थानांतरित करण्यात आले मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. विरुद्ध दिशेने येत असलेल्या आत्राम यांना सुद्धा गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना चंद्रपूर येथे उपचारार्थ भरती करण्यात आले. घटनेचा पुढील तपास गडचांदूरचे थानेदार सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here