टि बी अहिरे मॅडम यांची ग्रामपंचायत चौबारी येथे प्रशासक नियुक्ती झाल्या बद्दल पोलिस पाटील भावना पाटील यांनी सत्कार केला

0
460

जळगाव जिल्हा प्रतिनिधी विशाल सुरवाडे 
जळगाव येथील अमळनेर तालुक्यातील , टि बी अहिरे मॅडम यांची ग्रामपंचायत चौबारी येथे प्रशासक नियुक्ती झाल्या बद्दल पोलिस पाटील भावना पाटील यांनी सत्कार केला या प्रसंगी अंगणवाडी सेविका मदतनीस, मालुबाई कढरे ग्रामस्थ हजर होते.अहिरे मॅडम कडे पोलिस पाटील व ग्रामस्थांनी वेथा मांडली गावांचा मध्येभागी उखरडे आहेत व गटारी पुर्ण पणे घाणीचे भरले आहेत लोकांना त्रास सहन करावा लागत आहे .अशी रोगराई मुळे गावात बरेच आजारांना लोकांना सामोरे जावे लागत आहे गावात मोठे फलक लावले गेले आहेत या फलक मध्ये स्वच्छ गाव व सुंदर गाव असे लिहिले आहे .हे फक्त कागदोपत्री स्वच्छ व सुंदर आहे असे दिसून येते आहे .येथे स्वछ व सुंदर गाव चा फज्जा उडालेला दिसून येते ग्रामपंचायत ला लेखी अर्ज देखील दिले आहेत व बरेच वेळेस तोंडी सांगितले आहे तरीसुद्धा उखरडे उचलत नाही व बातम्या ही प्रकाशित केले आहे. मॅडम आम्ही तुमच्याकडे येवडी अपेक्षा करतो की,तुम्ही तुमच्या थरावर उखरडेचे विल्हेवाट लावावी अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे तुम्ही कोणाचाही दबावाखाली काम करणार नाही अशी ही ग्रामस्थांची इच्छा आहे. मॅडमने सांगितले की, गावांचा जा काही छोट्या मोठ्या समस्या असतील मार्गी लाऊ विशेष म्हणजे उखरडे आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here