बंदर (शिवापूर) येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा
विविध उपक्रमानी डॉ. कलामांना विद्यार्थ्यांचे अभिवादन

आशिष गजभिये । तालुका प्रतिनिधी
चिमूर । तालुक्यातील बंदर(शिवापूर) येथे माजी राष्ट्रपती डा.ए. पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिवस व धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात आला.
सद्या कोविड-१९ या विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावाने राज्यभरातील शाळा बंद अवस्थेत आहेत. चिमूर तालुक्यातील बंदर(शिवापूर) येथील होतकरु तरुण युवकांच्या माध्यमातून मागील दोन महिन्यांपासून या गावातील समाजमंदिरात ज्ञानशाळेचा उपक्रम सुरू आहे.माजी राष्ट्रपती भारतरत्न डा. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सलग तीन तास वाचन करून मिसाइलमॅन कलाम यांना अभिवादन केले.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच श्रीभरोष ढोक, उडीची फाउंडेशन नोएडा चे अक्रम शेख, विक्की मराठे,अंगणवाडी सेविका शशिकला नन्नावारे , रमाबाई लोणारे,धरती गेडाम अर्चना मेश्राम,ऋत्विक मेश्राम उपस्थित होते. मान्यवरांनी दिवसाच एतिहासिक महत्व विषद करत डा. कलाम यांचं जीवनचरित्र व त्यांचं देशासाठी असलेलं योगदान या वेळी विषद केलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश नन्नावरे,संचालन अनिरुद्ध वासनिक तर आभार सुमेध श्रीरामे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशिष जीवतोडे,आदित्य वासनिक,सुरज गायकवाड, राजू ननावरे, पवन तरले ,रुपेश गायकवाड अमोल कावरे यांनी परिश्रम घेतले.