‘ती हत्याच’ अज्ञात महिलेच्या शवाची ओळख पटली

0
740

‘ती हत्याच’ अज्ञात महिलेच्या शवाची ओळख पटली

 

विरुर स्टे./राजुरा, 21 फेब्रु. : 18 फेब्रुवारीला कविटपेठ शेतशिवारातील विहिरीत एका अनोळखी युवतीचे शव आढळले होते. या घटनेचे वृत्त इम्पॅक्ट 24 न्यूज ने प्रकाशित केले होते. या शवाची ओळख पटली असून या हत्येचा उलगडा झाला आहे. या खुनातील आरोपींना विरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृतक युवतीचे नाव सैदा बदावत (30) असे असून ती कोंडापल्ली (विजयवाडा) येथील रहिवासी असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. तसेच ती 4 ते 5 महिन्याची गर्भवती असल्याचे समजले. सदर महिलेचा विवाह दहा वर्षाअगोदर झाला होता. तिला 9 वर्षाची मुलगी आहे. मात्र ती पतीला सोडून आई-वडिलांकडे राहत होती. पण सदर महिलेचा पर पुरुषांशी संबंध असल्याने आपली समाजात नाहक बदनामी होईल या कारणाने तिच्याच जन्मदात्या आईने तिला ठार मारण्याची सुपारी दिली. या हत्येतील आरोपी दोन महिला व एका पुरुषाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंडीगेट येथील रहिवासी सिन्नू नरसिम्हा अजमेरा (35), शारदा सिन्नू अजमेरा (26) व मृत युवतीची आई लचमी भिमा बदावत (50) रा. कोंडापल्ली, विजयवाडा, आंध्रप्रदेश यांना अटक करण्यात आली आहे.

शेतविहिरीत आढळले अज्ञात महिलेचे शव

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात विरुर पोलिस स्टेशनचे सपोनि राहुल चव्हाण, माणिक वाग्दरकर, दिवाकर पवार, नरगेवार, विजय मुंडे, सविता गोनेलवार, सुरेंद्र काळे, भगवान मुंडे, अशोक मडावी, प्रमोद मिलमिले, अतुल सहारे, लक्ष्मीकांत खंडाळे, ममता गेडाम यांनी पार पाडली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here