शेतविहिरीत आढळले अज्ञात महिलेचे शव

0
1935

शेतविहिरीत आढळले अज्ञात युवतीचे शव

राजुरा, 18 फेब्रु. : कविटपेठ शेतशिवारातील अर्जुन मल्ला आत्राम यांच्या शेतात एका अज्ञात युवतीचे शव आढळून आले. हि घटना आज दुपारी शेतकरी शेतात गेला असता उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की, शेतकरी रोजच्या प्रमाणे शेतात गेला असता त्यांना त्यांच्या शेतातील विहिरीत एका अज्ञात युवतीचे शव तरंगत असताना दिसून आले. याची माहिती सदर शेतकऱ्याने विरुर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच विरुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सदर महिलेचे शव विहिरी बाहेर काढण्याल आले आहे. हा घातपात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून या घातपाता मागचे नेमके कारण अजूनपर्यंत कळू शकले नाही. सदर युवतीची ओळख पटली नाही.

शवाला कपड्याने दगड बांधून शव विहिरीत टाकण्यात आले असल्याची शंका आहे. यामुळे घातपात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. नेमकी ही घटना कधी व कशी घडली याचा उलगडा करण्याचे शर्थीचे प्रयत्न पोलिसांचे सुरू आहेत. कविटपेठ शेतशिवारात हि घटना प्रथमताच घडली असल्याने नागरिकांची बरीच गर्दी जमली. पुढील तपास विरुर पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here